Sudhir Mungantiwar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Tigers & Politics : पक्षांतले वाघ कमी झाले, पण राज्यात मात्र वाघ घेता वाघ अशी स्थिती!

Sampat Devgire

Sudhir Mungantiwar news : शिवसेनेचा नामोल्लेख टाळून एका सदस्यांने पक्षातील वाघ कमी झाले आहेत, असा उल्लेख केला. त्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी `पक्षातील वाघ कमी झाले, मात्र राज्यात वाघ खुप वाढले आहेत. ५०० वाघ झाले आहेत. वाघ घेता का वाघ असे म्हणण्याची वेळ आली आहे` असे सांगितले. (Now a days there are more then lots of rise in tigers & now 500 tigers in the state)

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या मानवी, पाळीव जनावरे यांच्या हानीबाबात वाढीव भरपाईचे बील मांडले. यावेळी राज्यातील (maharashtra) वन विभागाची स्थिती मांडली.

यावेळी सदस्यांचा आग्रह विचारात घेऊन वन विभागाशी संबंधीत प्रश्नांबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे वनमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर सर्व सदस्यांना वन विभागाचे अतिथी म्हणून जंगलात अथवा ताडोबा व्याघ्र प्रकल्पात घेऊन जाऊ असे सांगितले. भरपाईत लक्षणीय वाढ करण्याचा या बिलात समावेष आहे.

यावेळी विविध सदस्यांनी केलेल्या सुचनांचा विचारात घेऊन वनमंत्री म्हणाले, वन विभागाबाबत अनेक सुधारणा गेल्या काही दिवसांत झाल्या आहेत. आत आपण २५ लाख भरपाई देणार आहे. आता जंगलात विपुल बिबटे झाले आहेत. पूर्वी १७० वाघ होते, ते पाचशेच्या पुढे झाले आहेत. त्यामुळे आपण जसा पक्ष बदलतो तसे वाघांचेही क्षेत्र बदलता येईल का याचाही विचार करण्याची गरज आहे. सह्याद्रीत काही वाघ सोडता येतील का याचा विचार सुरू आहे.

या विषयावर सतेज पाटील, सचिन अहीर, सुरेश धस, शशिकांत शिंदे, अभिजित वंजारी यांसह विविध सदस्यांनी चर्चेत भाग घेत विविध सूचना केल्या. वनजमिनींच्या वाटपासह विविध विषयांलर यावेळी चर्चा झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT