Vikhe Vs Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vikhe Vs Thorat : 'मुख्यमंत्री काय यंदा आमदार सुध्दा होणार नाहीत!' विखेंची थोरातांच्या बालेकिल्ल्यातच तोफ धडाडली

Sujay Vikhe criticizes Balasaheb Thorat: भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी संगमनेर मतदार संघात युवा संकल्प मेळावा घेत, बाळासाहेब थोरातांवर जोरदार टीका केली.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना त्यांच्या बालेकिल्ला संगमनेरमध्ये जावून ललकारलं.

"आजची सभा हा फक्त ट्रेलर आहे. तालुक्यात परिवर्तन होणार. यात महिलांचा खूप मोठा वाटा असणार. दहशत झुगारून परिवर्तनासाठी ठेकेदारी संस्कृतीविरोधात युवकांनी उभं राहावं. मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणारे, यंदा आमदार सुद्धा होऊ शकणार नाही", असा घणाघात सुजय विखे यांनी बाळासाहेब थोराताविरुद्ध केला.

संगमनेर तालुक्यातील तळेगाव इथं झालेल्या युवा संकल्प मेळाव्यात माजी खासदार सुजय विखे यांनी काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या चाळीस वर्षाच्या कार्यपध्दतीवर जोरदार टीका केली. वर्षानुवर्ष या भागातील महिलांच्या डोक्यावरील हांडा उतरवू न शकलेले कोणत्या विकासाची भाषा करतात? असा प्रश्न करत तालुक्यात फक्त नातेवाईकांसाठी राजकारण केल्याचा आरोप सुजय विखेंनी थोरातांवर केला.

'नाते ठेकेदार आणि जमिनीचा ताबा मिळवणारे एवढीच ओळख पद वाटताना दाखवली जाते. पण तळेगाव, निमोण भागातील तरुणांनी या मातीची शान राखून परिवर्तन केले. असेच परीवर्तन आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत करायची असून दोन दिवसात पक्षाचा निर्णय होवून संगमनेर विधानसभा मतदार संघाची जागा भाजपच्या (BJP) वाट्याला येईल', असा विश्वासही माजी खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केला.

'चाळीस वर्षे तालुक्याला मोठी पद मिळाली. पण निधी आणता आला नाही. मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून तळेगावला 44 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. निळवंडे धरणाचे पाणी आले. अनेक वर्ष फक्त विखे परिवारावर टीका केली. पण साईबाबांच्या आशीर्वादाने विखे कुटुंबातील मुलगाच जिल्ह्याचा पालकमंत्री झाला आणि निळवंड्याचे पाणी आणून दाखवले, आता भोजापूर चारीचे पाणी सुध्दा विखेच आणून दाखवतील, असा दावा त्यांनी करताना पुढची चाळीस वर्षे तालुक्यातील युवकांच्या उज्वल भवितव्याची असतील', अशी ग्वाही सुजय विखेंनी दिली.

'यशोधन'च्या सूत्रांवर विश्वास ठेवू नका 

अनेक वर्ष एकाच घरात सत्ता असल्याचा आरोप करून आता तुमची मनमानी बास झाली. आजची सभा तालुक्यातील परिवर्तनाची नांदी आहे. आमचा कार्यकर्ता शिवरायांचा मावळा आहे. पाकिट संस्कृतीत वाढलेला नाही. अशा शब्दात त्यांनी थोरातांच्या दहशतीचा समाचार घेतला. सुजय विखेंना तिकीट नाकारले, आशा बातम्या जाणीवपुर्वक पेरल्या गेल्या. कोणत्या सूत्रांची माहिती आहे, तुम्हाला माहीत आहे. 'यशोधन'च्या सूत्रांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करून संगमनेरचा मतदार संघ भाजपला मिळणार असल्याचा दावा सुजय विखेंनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT