Uddhav Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackeray : 'पाकिस्तानही सांगेल की शिवसेना कुणाची?; पण मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला...'

Jalgaon News : आम्ही अशा घुसा खूप पाहिल्या; उद्धव ठाकरे यांचा गुलाबराव पाटलांवर हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

Jalgaon News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जळगावमध्ये आज (दि.२३ एप्रिल) जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी शिंदे गटासह गुलाबराव पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर देखील त्यांनी जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, ''या सभेला जमलेली गर्दी पाहिल्यानंतर हे कळतं की शिवसेना कुणाची आहे. पाकिस्तान सुद्धा सांगेल की शिवसेना कुणाची आहे. पण आपल्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला हे कळत नाही. मात्र, तो त्यांचा दोष आहे''.

''त्यानंतर काही जणांना वाटलं की ते म्हणजेच शिवसेना. मग काय म्हणाले की आम्ही सभेत घुसणार आहोत, आम्ही अशा घुसा खूप पाहिल्या आहेत. पण या सर्वांना येणाऱ्या निवडणुकीत दाखून द्यायचं आहे', असं म्हणत त्यांनी गुलाबराव पाटलांना टोला लगावला.

''40 गद्दार गेले तरी काही फरक पडत नाही. पण एक निष्ठावंत गेल्यावर फरक पडतो. आजही आर ओ तात्यांची उणीव भासवते. निवडूण दिलेले गद्दार झाले आहेत. मात्र, निवडून देणारे आजही माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे या गद्दारांना जसं आपण घोड्यावर बसवलं, तसंच खाली खेचण्याची वेळ आली आहे'', असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीका केली.

''आता हे उलट्या पायाचं सरकार आलं आहे. उलट्या पायाचं सरकार राज्यात आल्यापासून अवकाळी पाऊस सुरू आहे. अवकाळीने नुकसान झालेल्यांना भरपाई देखील अद्याप मिळाली नाही. माझ्याकडे शेतकऱ्यांनी टोहो फोडला''.

''आता जर त्यांना व्यासपीठावर आणलं तर त्यांनाही हे सरकार अटक करतील. सरकार विरोधात बोलणाऱ्यांना लगेच अटक करण्यात येते. खरं तर खरं बोललं तर अटक करण्यात येते'', असं म्हणत भाजपवर टीका केली.

(Ediited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT