Bachchu Kadu vs BJP : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना त्यांच्या बालेकिल्ला शिर्डी इथं जाऊन डिवचलं. बच्चू कडू यांनी मंत्री विखेंवर टीका करताना, त्यांची जीभ घसरली. खूप खालच्या स्तरावर टीका केल्याने, त्याच्या रिअॅक्शन बच्चू कडू यांना देखील सहन कराव्या लागणार, असे संकेत देखील मिळू लागले आहेत.
बच्चू कडू यांच्या खालच्या स्तरावरील टीकेला भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कोणत्या पद्धतीने उत्तर देतात, याकडे आता लक्ष असणार आहे. तसेच भिक्षेकऱ्यांचा मृत्यूचा मुद्दा देखील यानिमित्ताने तापणार आहे.
शिर्डीतील चौघा भिक्षेकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणावर बच्चू कडू हे शिर्डी (Shirdi) इथं दौऱ्यावर होते. भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर राहाता तहसीलदार, त्यांच्या नातेवाईकांना भेटायला गेले नाही, म्हणून बच्चू कडू यांनी तहसीलदारांना चांगलेच झापले. मयत व्यक्ती भिक्षुक होते की, भक्त होते, याबाबत चौकशी का केली नाही? असा प्रश्न देखील बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी या मृत्यूप्रकरणातील दोषी असलेल्या कारवाई करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला. तहसीलदाराला घटनेबाबत माहिती नाही, हे चांगलं नाही. तहसीलदार तुमची कमाल आहे. श्रीमंत मेल्यावरच जाल का? वाटतं का काही, पीडित कुटुंबाच्या भेटीला जाऊन या, नाहीतर उचलून न्यावे लागेल, असा दम देखील बच्चू कडू यांनी तहसीलदारांना दिला.
यानंतर बच्चू कडू यांनी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीकास्त्र सोडले. ही टीका करताना, बच्चू कडू यांनी जीभ घसरली. पण त्यात भिक्षेकर्यांच्या मृत्यूचा संताप होता, असे प्रत्यक्ष उपस्थितांचे म्हणणे आले. बच्चू कडू यांनी, 'ते तर मतांचे भिकारी आहेत. विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुका आल्या की भीक मागतात. खरे भिकार.. तर तेच आहेत', अशी खरमरीत टीका मंत्री विखेंवर केली.
'इथले आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांचे काही कर्तव्य नाही का? प्रशासनाच्या ताब्यात असलेली माणसं मरत असेल, तर सरकारी कार्यालय हवीच कशाला? पीडित कुटुंबांची भेट घ्या, असा आदेश पालकमंत्र्यांनी तसहीलदारांना द्यायला हवे होते. तसीलदाराला ठोकलं असतं, तर गुन्हा दाखल झाला असता. प्रशासनाच्या कारवाईत लोक मेली, तरीही गुन्हा दाखल होत नाही. वर्षभर सापाला मारायचं आणि नागपंचमीला पूजायचं, राज्यकर्त्यांनी मतदारांची, अशी अवस्था केलीय', असा घणाघात देखील बच्चू कडू यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.