Ahmednagar News : राहता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार आज थंडावला. या कारखान्याच्या निवडणुकीसाठी शनिवारी (17 जून) मतदान पार पडणार आहे. गणेश कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून राजकीय वातावरण चागंलच तापलं होतं.
गणेश कारखान्याच्या निवडणुकीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनेलच्या विरोधात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे यांनी एकत्रित पॅनेल उभा केलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोठी रंगत वाढली.
गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात माजी आमदार स्नेहलता कोल्हे या देखील मैदानात उतरल्या होत्या. गणेश कारखान्याच्या निवडणुकीत थोरात-कोल्हे गटाच्या पॅनलच्या प्रचाराची धुरा संजीवनीच्या कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या खांद्यावर होती. पण शेवटच्या टप्यात माजी आमदार स्नेहलता कोल्हे या देखील प्रचारात उतरल्यामुळे या निवडणुकीत मोठी रंगत पाहायला मिळाली.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शिर्डी येथे जाऊन गणेश परिवर्तन मंडळाचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव कोते पाटील आणि राष्ट्रवादी युवकचे माजी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्याशी भेट घेत निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा केली. त्याबरोबरच त्यांनी शिर्डी, राहता गटात पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत चर्चा केली.
दरम्यान, गणेश सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होत असून यासाठी उद्या (17 जून) मतदान पार पडणार आहे. गणेश कारखान्याच्या निमित्ताने नगर जिल्ह्यातील प्रमुख नेते आमने-सामने आल्यामुळे या निवडणुकीला महत्व प्राप्त झालं आहे.
या निवडणुकीसाठी अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली असून आता मतदार कुणाच्या बाजूने कौल देतात? हे मात्र, निकालानंतरच समोर येणार आहे. सध्या गणेश सहकारी साखर कारखाना हा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या ताब्यात आहे.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.