Shevgaon Market Committee Election
Shevgaon Market Committee Election  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shevgaon Bazar Samiti Results: शेवगाव बाजार समितीवर चंद्रशेखर घुलेंनी एकहाती सत्ता मिळवली

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar News : राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. त्यानंतर अनेक बाजार समित्यांचे निकालही आजच समोर आले आहेत. यातच नगर जिल्ह्यातील शेवगाव बाजार समितीचा निकाल समोर आला आहे.

शेवगाव बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या पॅनलने 18 पैकी 18 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे.

माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या गटातील सर्वच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. शेवगाव बाजार समितीतच्या 18 जागांपैकी 18 जागा चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वातील पँनलने जिंकल्या आहेत.

दरम्यान, शेवगाव बाजार समितीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, या निवडणुकीत माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वातील पँनलने बाजी मारली आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT