Radhakrishna Vikhe Patil and Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Thorat vs Vikhe Patil: ही सुरुवात आहे हे लक्षात ठेवा; गणेश कारखान्याच्या निकालानंतर थोरातांचा विखेंना इशारा

Ganesh Sugar Factory Result : गणेश कारखाना निवडणुकीच्या निकालानंतर बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना थेट इशारा दिला.

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar Politics News : गणेश सहकारी साखर कारखान्यावर गेल्या आठ वर्षांपासून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची असलेली सत्ता माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि भाजपचे नेते विवेक कोल्हे यांनी हिसकावून घेतली. सोमवारी (दि.19) झालेल्या मतमोजणीत थोरात-कोल्हे यांच्या पॅनलने 19 पैकी 18 जागा जिंकून मोठा विजय संपादन केला.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत नगर जिल्ह्यातील दिग्गज नेते आमने सामने आल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर या निवडणुकीत थोरात-कोल्हे गटाने मोठा विजय संपादन केला. तर या निवडणुकीत विखे गटाला मोठा धक्का बसला.

गणेश कारखान्याच्या निकालानंतर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना थेट इशारा दिला. बाळासाहेब थोरात म्हणाले, "ही सुरुवात आहे हे लक्षात ठेवा. गणेश कारखान्याच्या निवडणुकीत दहशतीच्या राजकारणाला सुरुंग लावण्याचं काम झालं आहे", असं म्हणत नाव न घेता विखे पाटलांवर थोरातांनी जोरदार टीका केली.

"राजकारण करत असताना दहशतीचे राजकारण करायचं. लोकांची पिळवणूक करायची. लोकांना गुलाम बनवून राजकारण करायचं. त्यांची मानसिकता हालाखीची करायची, त्यानंतर लोकांना म्हणायचं की, मत द्या, नाही तर पाहन घेऊ, मग लोकं मत देतात.

या पद्धतीचे राजकारण करण्याची पद्धत या भागात आहे. मात्र, या पद्धतीच्या राजकारणाला सुरुंग लावण्याचं काम या निवडणुकीत झालं, पण ही तर सुरुवात आहे, हे त्यांनी लक्षात घ्याव", असा थेट इशारा बाळासाहेब थोरातांनी दिला आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT