Ahmednagar News : अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना न्यायालयाने दहा ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
राहुरी न्यायालयात काल रात्री उशिरापर्यंत सरकार पक्ष आणि आरोपीच्या वकिलाकडून युक्तिवाद सुरू होता. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने भानुदास मुरकुटे यांची पोलिस कोठडीत रवानगी केली.
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी पीडित महिलेला सुरेगांव (ता. नेवासा) इथल्या शेत जमिनीवर कामाला ठएवून 10 एकर जमीन घेऊन देतो, पीडितेचा अल्पवयीन मुलगा आणि साक्षीदार यांना नोकरी देतो, बंगला बांधून देतो, असे खोटे बोलून, आमीष दाखवून भूरळ पाडून फिर्यादीवर वेळोवेळी अत्याचार केला. पीडितेच्या पाथरे (ता. राहुरी) येथील एका घरा, सुरेगांव (ता. नेवासा) इथल्या शेतातील घरा, श्रीरामपूरमधील अशोक सहकारी बँकच्या (Bank) कार्यालयामध्ये, अहमदनगर शहरातील घासगल्ली इथल्या अशोक सहकारी बँकेच्या कार्यालयात, मुंबईतील चेंबूर इथल्या अष्टविनायक सोसायटीमधील फ्लॅटमध्ये आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील फ्लॅटमध्ये वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचे पीडितीने फिर्यादीत म्हटलं आहे.
याबाबत कोठे वाच्यता केल्या पीडिता आणि साक्षीदाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसंच श्रीरामपूर इथल्या अशोक सहकारी बँक कार्यालयात अत्याचार करण्यापूर्वी शीतपेयात दारूसारखा पदार्थ मिसळून काहीतरी पाजले, असेही पीडितेने फिर्यादीत म्हटलं आहे.
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना अटक केल्यानंतर त्यांना राहुरी न्यायालयात पोलिस (Police) निरीक्षक संजय ठेंगे यांनी हजर केले. पोलिसांनी न्यायालयाकडे तपासासाठी पाच दिवसांत पोलिस कोठडी मागितली. वकील महेश तवले, वकील सुमित पाटील आणि वकील संजय दुशिंग यांनी आरोपींच्यावतीने न्यायालयात युक्तिवाद केला.पोलिसांनी गुन्ह्यातील वाहन जप्त करणे आहे. तसंच अंगावरचे कपडे, मोबाईल जप्त करायचा आहे. आरोपी फिर्यादीकडे पाठवत असलेल्या चारचाकी वाहनाचा शोध घ्यायचा आहे.
आरोपीने अत्याचार करण्यापूर्वी पीडितेला शीतपेयातून दारूसारखा कोणता पदार्थ पाजला, तो कोठून उपलब्ध केला, तो पदार्थ कोणता होता, याचा शोध घ्यायचा आहे. अशोक सहकारी बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये घेऊन जाऊन पीडितेवर अत्याचार केला, त्याचा शोध घ्यायच आहे. पीडितेचे साखर कामगार हाॅस्पिटलमध्ये बळजबरीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली आहे, त्यासाठी आरोपीला कोणी मदत केली, त्याचा तपास करायचा आहे. मुंबईतील चेंबूर इथं पीडितेला घेऊन जाण्यासाठी कोणत्या वाहनाचा वापर केला, याचा शोध घ्यायचा आहे. चेंबूरमधील फ्लॅट कोणाचा आहे. याठिकाणी आरोपीला कोणी मदत केली आहे का? याचा शोध घ्यायचा आहे.
याशिवाय आरोपीने पीडितेला दिल्लीतील महाराष्ट्र सदन भवनात घेऊन गेले होते. कोणत्या विमानानं प्रवास केला, त्याचं तिकीट जप्त करायचे आहे. तसंच महाराष्ट्र सदनातील फ्लॅट कोणी उपलब्ध करून दिला, याचा तपास करायचा आहे. शारीरिक संबंधांचे व्हिडिओ, फोटो आरोपीकडे असण्याची शक्यता आहे, त्याचा शोध घ्यायचा आहे. गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेल्या मोबाईलचा पासवर्ड घेऊन त्याचा तपास करायचा आहे, असा रिमांड रिपोर्ट पोलिसांनी न्यायालयासमोर ठेवला. पोलिसांनी बेकायदेशीररित्या अटक केल्याचा दावा, आरोपींच्या वकिलांनी केला. दोन्हीकडचा युक्तिवादानंतर न्यायालयाने भानुदास मुरकुटे यांना 10 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.