Nitin Raut
Nitin Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आंबेडकरी चळवळीतील नेत्यांवर किती विश्वास ठेवायचा?

Sampat Devgire

नाशिक : केंद्र सरकारचे (BJP Government) धोरण पाहिले तर मागासवर्गीय व अन्य सर्व मागास घटकांची पद्धतशीर कोंडी केली जात आहे. या सरकारच्या धोरणामुळे राज्यघटनेचे (Constitution) चारही स्तंभ ढासळू लागले आहेत. तरीही आंबेडकरी चळवळीतील नेते, सरकारला पाठींबा देणारे नेते गप्प का? असा प्रश्न राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केला.

श्री. राऊत यांनी आज येथील एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राला भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कोणत्या चळवळीत, कोणत्या घटकांसमवेत जावे हे आंबेडकरी चळवळीतील नेतेच ठरवू शकतील. चळवळीतील कार्यकर्त्यांनीच ते ठरवायचे आहे. त्यावर मी काहीही भाष्य करू शकणार नाही.

ते पुढे म्हणाले, आंबेडकरी चळवळीत एकत्र येण्याचे प्रयत्न यापूर्वी देखील अनेकदा झाले आहेत. त्याबाबत त्या त्या नेत्यांनी देखील प्रयत्न केलेले आहेत. मात्र स्वतः ते कधी तिकडे गेले नाही. दुसऱ्यांनाही जाऊ दिलेले नाही. अशा वेळेला त्या नेतृत्वावर मी किती विश्वास ठेवावा हा प्रश्नच आहे. त्यावर मी काय भाष्य करावे हे मला कळत नाही.

यावेळी श्री. राऊत यांनी केंद्र सरकारवर टिका केली. ते म्हणाले, या सरकारने अनुसुचित जाती, जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील घटकांसाठीच्या योजनांबाबत गांभिर्याने काम केलेले नाही. या घठकांना लोकसंख्येच्या प्रमाणात जो निधी देणे अपेक्षित आहे, तसा निधी दिलेला नाही, हे निश्चितपणे सांगू इच्छीतो. त्यामुळे हे सरकार अपयशी ठरलेले आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. त्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. हा निधी केंद्र सरकारने कमी केलेला आहे. त्यांना देखील अनेक महिने वाट पहावी लागत आहे. पीएच. डी. किंवा एणफील करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संशोधनासाठी जी राजीव गांधी शिष्यवृत्ती योजना होती. त्याचाही अद्याप पत्ता नाही. यावरून आम्ही काय समजायचे. ही मंडळी आपल्या समाजाप्रती किती आपुलकीने वागते? दाखवते काय आणि वागते काय? हे अतिशय चिंताजनक आहे.

श्री. राऊत म्हणाले, आज संविधान बाजुला सारून त्या विरोधात काम या देशात सुरु आहे. संविधानाचे जे चार स्तंभ आहेत, ते ढासळत चालले आहेत. अशी परिस्थिती बनलेली असताना ही मंडळी का गप्प बसुन आहेत. का या विषयावर बोलत नाही. यांच्या सोबत चळवळीतील लोकांनी किती जावे आणि जाऊ नये त्याची मिमांसा आणि शोध घेण्याची गरज आहे. मी त्यांना याबाबत केवळ शुभेच्छाच देऊ शकतो.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT