Ambadas Danve In Manmad Meeting
Ambadas Danve In Manmad Meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena: आगामी काळ फक्त ठाकरेंचा...इतरांची धुळधाण!

Sampat Devgire

मनमाड : शिवसेना (Shivsena) संघटना ही रेल्वेसारखी आहे. अनेक जण उतरतात तितकेच बसतातही. त्यामुळे कोण येते, कोण जाते यापेक्षा सत्ता नसताना मातोश्रीवर (Matoshree) लोकांची रीघ लागलेली आहे. सत्ता नसतानाही लोक पक्षात येत आहेत. शिवसेना पक्ष मजबूत आहे. त्यामुळे आगामी काळ हा ठाकरेंचा असेल, असा विश्‍वास विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते (Leader of opposition) अंबादास दानवे (Amabadas Danve) यांनी व्यक्त केला. (Ambadas Danve challang in Manmad to Shinde group`s Suhas Kande)

येथील पल्लवी मंगल कार्यालयात शिवसेनेतर्फे नागरी सत्कार आणि शिवसेना शिवसैनिक संवाद मेळाव्यात ते बोलत होते. युवासेना प्रमुख आदित्या ठाकरे यांच्या नंतर थेट एकनाथ शिंदे गटाच्या आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी थेट इशारा दिला. यावेळी त्यांच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होती.

या वेळी श्री. दानवे म्हणाले, बाकीचे पक्ष निवडणुका आल्यावर काम करतात. मात्र, शिवसेनेचे काम सतत चालू असते. शिवसेना मजबूत पक्ष संघटन आहे. अनेक बंडखोरी, गद्दारी बघितली. ५० खोके आता लहान लहान मुले बोलू लागले आहेत. ज्यांनी खोके घेतले त्यांना निवडणुकीत जनता ओके करेल. शिवसेनेवर प्रेम करणारे माणसं वाढत आहे.

कोविड काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘कुटुंबप्रमुख’ म्हणून जनतेने संबोधले. हा मान कोणाला मिळाला नाही, मिळणारही नाही. गद्दारांनी निष्ठा बाजूला सारून गद्दारी केली. इतिहास निष्ठावणाचा असतो गद्दारांचा नाही, असे त्यांनी नमूद केले. आमदार किशोर दराडे, माजी आमदार राजेंद्र देशमुख, तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांनी मनोगत व्यक्त केले.

कोरोनायोद्ध्यांचा सन्मान

जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या अभिष्टचिंतननिमित्त मिलिंद सामाजिक व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष समाजसेवक विलास कटारे यांच्यातर्फे कोविड काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. निधी भन्साळी, डॉ. मिलिंद धारवडकर, डॉ. बाबुराव गोरे, सिस्टर मारिया, सिस्टर रेखा लाड, डॉ. तन्मय कुलकर्णी, श्री. पगारे, डॉ. विनोद ठाकरे, डॉ. रोहन बोरसे, गायक विनोद केदारे यांच्यासह ७० अंगणवाडी सेविका, १५ आशासेविका, ६ हॉस्पिटल नर्स यांचा आरोग्यदूत पुरस्कार देऊन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या वेळी जिल्हासंपर्क प्रमुख जयंत दिंडे, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक, अल्ताफ खान, जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक संजय कटारिया, शहरप्रमुख माधव शेलार, विजय मिश्रा, अंकुश गवळी, दिनेश केकान, संतोष जगताप, दिलीप सोळसे, भय्या घुगे आदी उपस्थित होते. जावेद मन्सुरी यांनी सूत्रसंचालन केले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT