Dhule BJP News: भारतीय जनता पक्षाने आज राज्यातील ५८ शहर आणि जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली. यामध्ये धुळे शहराध्यक्षांना चाल देण्यात आली आहे. मात्र ही नियुक्ती होतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने भाजपवर राजकीय हल्ला चढवला.
भाजपच्या धुळे शहर अध्यक्षपदी गजेंद्र अंपलवार यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्षपदी बापू खलाणे यांचे नियुक्ती झाली आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा राजकीय आडाखा डोळ्यापुढे ठेवून या पदाधिकाऱ्यांना चाल देण्यात आली आहे.
ही नियुक्ती जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला आहे. शहराध्यक्ष अंपलवार यांच्यावर अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याचा उल्लेख करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे हेच का 'पार्टी विथ डिफरन्स'असा प्रश्न त्यांनी समाज माध्यमांवर उपस्थित केला आहे. धुळे शहरात भाजपची नियुक्ती होताच राजकीय आरोप प्रत्यारोप सुरुवात झाली आहे.
श्री अंपलकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आरोपाचा समाचार घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वादातून हा गुन्हा दाखल झाला होता. संदर्भात अद्याप कोणतेही कारवाई होत झाली नाही. मी साधा जामीनही घेतलेला नाही. यावरून संबंधित गुन्ह्याचे गांभीर्य काय असेल, हे लक्षात येते. संदर्भात पोलिसांनीही कोणतीच कारवाई केली नसल्याचे अंपलकर म्हणाले.
शहराध्यक्ष अंपलवार हे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांच्या कारकिर्दीत धुळे महापालिकेवर भारतीय जनता पक्षाने स्वबळावर सत्ता मिळवली होती. लोकसभा निवडणुकीतही अंपलवार यांनी पक्षांच्या सर्व घटकांमध्ये सुसूत्रता निर्माण केली होती.
आगामी महापालिका निवडणुकीचा विचार करून ही नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत विजय संपादन केला त्याच्या दुसऱ्या दिवशीच आम्ही निवडणुकीची तयारी सुरू करीत असतो. शहरात भाजपच्या माध्यमातून औद्योगिक वसाहत तसेच रामसृष्टीचे मोठे काम उभे राहत आहे. पाणीपुरवठ्यावर ठोस काम भाजपने केले आहे. यातूनच जनतेशी संपर्क वाढवून आगामी निवडणुकीत भाजप सत्ता काबीज करील, असा विश्वास अंपलकर यांनी व्यक्त केला.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.