Yeola Congress workers, Yeola News,  Nashik Latest Marathi News
Yeola Congress workers, Yeola News, Nashik Latest Marathi News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

सामान्यांच्या प्रश्नावर लढल्यानेच गांधी कुटुंबियांवर `ईडी`ची त्रास!

Sampat Devgire

येवला : काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. केंद्रातील भाजप (BJP) सरकार राजकीय सूडबुद्धीने वागत असून विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा सर्रास गैरवापर केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. (BJP Government harass Gandhi family through ED)

येवला लासलगाव विधानसभा अध्यक्ष मंगलसिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मोदी सरकारचा निषेध नोंदवत नायब तहसीलदार पंकज मगर यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की गांधी कुंटुबाला बदनाम करण्यासाठी भाजप सूडाचे राजकारण करत आहे. राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांना ईडीची नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलून दडपशाही सुरू केली आहे. (Nashik Latest Marathi News)

देशात सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लढणा-या पक्षाला केंद्रीय यंत्रणेचा वापर करून त्रास देण्याचे काम मोदी सरकार करत आहे. या सर्व घटनांचा जाहीरपणे निषेध नोंदवित असून, हे प्रकार असेच सुरू राहिले तर याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदन देताना जिल्हाध्यक्ष मानस पवार, ज्येष्ठ नेते सुरेश गोंधळी, जिल्हा सरचिटणीस संदीप मोरे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश भगत, प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड, मंगलसिंग परदेशी, ऋषिकेश पांढरे, दिगंबर आव्हाड, प्रणव लकारे, प्रतीक पुणेकर, शुभम गडकर, नशीब मुलतानी, अलताफ मुलतानी, मनोज गाडेकर, अशोक नागपुरे, राणा परदेशी, सौरभ जगताप, देवा घोलप, पंकज पांढरे आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT