Girish Mahajan & Rahul Dhikle Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Politics: सहा वेळा निवडून येण्याचे रहस्य काय?, मंत्री गिरीश महाजन यांनी उलगडले रहस्य..

Girish Mahajan; BJP leader Girish Mahajan wins six times from Jamner Constituency, he unfold the secret with MLA Rahul Dhikle -भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी सलग गेली सहा टर्म जामनेर मतदारसंघातून निवडणुका जिंकण्याचे तंत्र काय, हे सविस्तर सांगितले.

Sampat Devgire

Rahul Dhikle News: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सातव्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. जामनेर मतदार संघात मंत्री महाजन यांच्या विरोधात पूर्वाश्रमीचे भाजप नेते दिलीप खोडपे हे उमेदवारी करीत आहेत. श्री. महाजन यांनी निवडणूक जिंकण्याचे रहस्य काय, हे सांगितले.

नाशिक पूर्व मतदार संघातील उमेदवार आमदार राहुल ढिकले यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते. यावेळी मंत्री महाजन यांनी विधानसभा निवडणूक जिंकण्याचे रहस्य उलगडून दाखवले.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले, पूर्व मतदारसंघात गेल्या निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब सानप आणि राहुल ढिकले यांच्यात लढत झाली. त्यावेळी आमदार ढिकले अल्प आघाडीने निवडणूक जिंकले. यंदाही पुन्हा तशीच लढत होत आहे. माजी आमदार सानप यंदाही इच्छुक होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही चर्चा केल्यानंतर आमदार ढिकले यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्याला मुख्य कारण आमदार ढिकले हे जनसामान्यांमध्ये वावरणारे आहेत. लोकांशी त्यांचा मोठा संपर्क आहे. त्यामुळेच ते यंदा किमान पन्नास हजारांच्या आघाडीने विजयी होतील, असा दावा त्यांनी केला.

यावेळी मंत्री महाजन यांनी आपण गेली सहा टर्म जामनेर मतदार संघातून विजयी झालो. यंदा सातव्यांदा मी आमदार होणार आहे. त्याचे मुख्य कारण मी पाच वर्ष लोकांमध्ये वावरतो. त्यांच्या सुख दुःखात सहभागी होतो. त्यांचे सर्व प्रश्न सोडवतो. त्यामुळे निवडणुकीच्या कालावधीत मतदारांना उमेदवार आपल्या घरी आला पाहिजे, अशी मतदारांची अपेक्षाच नसते.

मी सध्या उमेदवार असलो तरी मतदारसंघात गेलेलो नाही. धुळे, नाशिक, नांदेड, जालना, कोपरगाव अशा विविध मतदारसंघांमध्ये फिरत आहे. नाशिक पूर्व चे उमेदवार राहुल ढिकले हे देखील अशाच प्रकारे लोकांमध्ये वावरतात. त्यामुळे ते यंदा पन्नास हजार मताधिक्क्याने विजयी होतील, असा दावा त्यांनी केला.

महाजन म्हणाले, पाच वर्षे तुम्ही लोकांमध्ये गेला नाही. गाडीच्या काचा खाली केल्या नाही. गाडीच्या काचेला काळी फिल्म लावली. तर मग पाच वर्षांनी मतदार देखील तुम्हाला टाटा, बाय-बाय करतात. तुमच्यासाठी दरवाजे, खिडक्या लावून घेतात.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT