Chhagan Bhujbal, Girish Mahajan sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणाबाबत भुजबळांची दुटप्पी भूमिका

छगन भुजबळांची (Chhagan Bhujbal ओबीसी आरक्षणाबाबत (OBC reservation) दुटप्पी भूमिका आहे, असा आरोप गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला आहे.

सरकारनामा ब्युरो

जळगाव ; आमचं सरकार असताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) 'ओबीसी आरक्षण' (OBC reservation), 'ओबीसी' असे सारखे ओरडत फिरत होते, परंतु त्यांचे सरकार आल्यानंतर ते काहीही करू शकले नाहीत, ते उघडे पडले आहेत ओबीसी आरक्षणाबाबत भुजबळांची दुटप्पी भूमिका आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार (गिरीश महाजन Girish Mahajan) यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल जळगाव येथे ओबीसी हक्क परिषदेत बोलताना केंद्र सरकारवर तसेच मागच्या सरकारवर जोरदार टीका केली. त्यावर भाजप नेते, माजी मंत्री आमदार गिरीश महाजन म्हणाले, ''ओबीसीच्या बाबतीत आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भूमिका अतिशय स्पष्ट होती. आमचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यभर फिरून. आपली भूमिका ओबीसी बाबत मांडत आहे. आता आपण तोंडावर पडलो आपले सरकार काही करू शकत नाही, मराठा आरक्षणाचे असेच तीन तेरा त्यांनी वाजविले, ओबीसी आरक्षणाचे त्यांनी तीन तेरा वाजविले. आता करणार काय तर असेच थातुर मातुर इकडे तिकडे फिरायचे तुम्ही शासनकर्ते तुम्ही राज्यकर्ते आहात. तुम्ही तुमची भूमिका न्यायालयात आणि केंद्राकडे मांडा, हे महत्वाचे काम दिले सोडून आणि लोकांची दिशाभूल करीत ते फिरत आहेत.''

''ओबीसी आणि मराठा आरक्षणा बाबतीत हे सरकार पूर्णपणे उघडे पडले आहे. या सरकारलाच आरक्षण नको आहे. या तीन पक्षाच्या सरकार मध्ये कुठही ताळमेळ नाही त्यामुळेच ओबीसीवर ही परिस्थिती ओढविली आहे त्याचे मूळ कारण हे मंत्री महोदय आणि त्यांचे सरकार आहे. त्यामुळे त्यांनी उगाच नाटके करण्यापेक्षा ठोस कारवाई करावी,'' असे महाजन म्हणाले.

''राज्यातील हे सरकार राम भरोसे सरकार आहे. नारायण राणे, किरीट सोमय्या यांच्या बाबतीत निर्णय झाले राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात किरीट सोमय्या यांच्या बाबतीत निर्णय झाला मला माहित नाही. तर राणे यांच्या बाबतीत निर्णय झाला हे मला माहीत नाही असे गृहमंत्री म्हणतात. म्हणजे ज्या पक्षाला उट्टे काढायचे आहे तो पक्ष निर्णय घेतो आहे. हे सरकार वाऱ्यावर आहे. सरकार कोण चालवितो आहे हेच आता कळत नाही. सर्व कारभार राम भरोसे सुरू आहे,'' अशी टीका महाजन यांनी यावेळी केली.

Edited by : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT