Girish Mahajan mission in Nashik election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime : नाशिकमध्ये नदी स्वच्छतेवेळी गिरीश महाजन यांना सापडलं पिस्तूल, तत्काळ पोलिसांना पाचारण

Girish Mahajan Pistol Found in River : नाशिकमध्ये पर्यावरण दिनानिमित्ताने नंदिनी नदी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन स्वत: या अभियानात सहभागी झाले होते.

Ganesh Sonawane

Nashik News : आगामी कुंभमेळा व पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील 'नंदिनी नदी महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं आहे. जलसंपदा व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन स्वत: या अभियानात सहभागी झाले होते. त्यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.

नंदिनी नदीच्या स्वच्छतेवेळी मंत्री गिरीश महाजनांना पिस्तूल सापडलं. यावेळी एकच खळबळ उडाली. नंदिनी नंदीच्या स्वच्छते मोहिमेदरम्यान काही पर्यावरण प्रेमींना हे पिस्तूल आढळून आलं. मंत्री महाजन यांनी देखील या पिस्तूलाची बारकाईने पाहणी केली.

पिस्तूल आढळल्यानंतर ताबडतोब पोलिसांना पाचारण करण्यात आलं. अज्ञात व्यक्तीनी हे पिस्तूल नदीत फेकून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी हे पिस्तूल आपल्या ताब्यात घेतलं.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली नंदिनी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'नंदिनी नदी स्वच्छता उपक्रमासाठी दहा प्रमुख ठिकाणांचे नियोजन करण्यात आले. त्यात पिंपळगाव बहुला, पप्प्या नर्सरी, सातपूर, आयटीआय परिसर, सिटी सेंटर मॉल परिसर, मिलिंदनगर, मुंबई नाका, पखाल रोड, तपोवन रोड, गोदावरी संगम यांचा समावेश आहे.

या महाअभियानात नागरिक, महिला, युवक, व्यापारी संघटना, डॉक्टर आणि अभियंता संघटना, सायकलिस्ट, ट्रेकर्स यांच्यासह भोसला मिलिटरी स्कूल, मराठा विद्या प्रसारक समाज, व्ही. एन. नाईक संस्था आणि विविध करिअर अकॅडमीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, इस्कॉन, आर्ट ऑफ लिविंग, श्री स्वामी समर्थ केंद्र (दिंडोरी प्रणित), जगद्‌गुरु नरेंद्राचार्य महाराज अनुयायी, बोहरा समाज, साधुसंत व आखाडे, अभाविप आणि भाजपा युवा मोर्चा यांसारख्या सामाजिक आणि धार्मिक संस्थांनीही यात योगदान दिले.

नदी स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून पर्यावरण संरक्षणासाठी जनसहभागातून उभारली जाणारी लोकचळवळ आहे. कुंभमेळ्यापर्यंत आपल्याला तीन चारवेळा हे काम करावे लागेल. या नंदिनी नदीचे रुप आपल्याला बदलायचे आहे. भावी पिढ्यांसाठी पर्यावरण जपणे आपली सामूहिक जबाबदारी आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT