Dilip Wagh, Girish Mahajan & kishor Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Politics: गिरीश महाजन यांची दुहेरी खेळी, एकनाथ शिंदेंना शह अन् अजित पवारांना धक्का!

Girish Mahajan; Girish Mahajan's message to MLA Kishore Patil through Dilip Wagh-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार दिलीप वाघ भाजपच्या वाटेवर

Sampat Devgire

Girish Mahajan News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार दिलीप वाघ पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत. ते लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील. यामध्ये भाजपची मोठी खेळी यशस्वी होणार आहे.

पाचोरा- भडगाव मतदारसंघात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मोठी खेळी खेळली आहे. या माध्यमातून त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार दिलीप वाघ हे भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत.

माजी आमदार वाघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाचोरा भडगाव मतदार संघातील प्रभावी नेतृत्व मानले जाते. माजी आमदार ओंकार आप्पा वाघ यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांनी मतदारसंघाचे मोठे प्रस्थ असलेले आर. ओ. तात्या पाटील यांचा पराभव केलेला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील ते उमेदवार होते.

मतदारसंघातील राजकारण सध्या शिवसेना एकनाथ शिंदेचे आमदार किशोर पाटील (९७,३६६) आणि त्यांच्या भगिनी शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी (५८,६७७) यांच्या भोवती फिरते आहे. भाजपचे नेतृत्व तिसऱ्या क्रमांकाची (५८,०७१) मते घेणाऱ्या अनिल शिंदे यांच्याकडे आहे.

जलसंपदा मंत्री महाजन यांनी जळगावच्या राजकारणात आपला प्रभाव वाढविण्यासाठी ही खेळी खेळली आहे. माजी आमदार वाघ भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील. त्यामुळे पाचोरा मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार किशोर पाटील यांची राजकीय कोंडी होणार आहे. त्याचवेळी महायुतीचे दुसरे घटक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षालाही मोठा राजकीय धक्का असेल.

माजी आमदार वाघ हे पाचोरा भडगाव मतदार संघातील मोठे प्रस्थ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी यंत्रणा त्यांच्या माध्यमातून सक्रिय आहे. सध्या राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या सावलीत वाघ यांना पुढील मार्ग दिसतो आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची संघटना मात्र खिळखिळी होणार आहे. त्यामुळे हा एकाच वेळी महायुतीतील दोन्ही घटक पक्षांना इशारा मानला जातो.

या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील राजकारणात भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढणार आहे. सध्या जिल्ह्याचे बहुतांशी सत्ता आणि अन्य पदे भाजपकडे आहेत. भाजपच्या विरोधकांना कमकुवत करण्यासाठी या पक्षाचे नेते सातत्याने सक्रिय असतात. त्या तुलनेत भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांची राजकीय कोंडी केली जाते. माजी आमदार वाघ यांचा भाजप प्रवेश त्या दृष्टीनेच पाहिला जात आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT