Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Politics: भाजप नेत्यांचे थेट मंत्री गिरीश महाजन यांना साकडे.... काय आहे प्रकरण!

Girish Mahajan; Leaders upset over rebels' move to join BJP-भाजप नेते पक्षांतरांचा आनंद साजरा करायचे, आता तेच पक्षांतर भाजपच्या नेत्यांच्या अस्वस्थतेचे कारण ठरतेय.

Sampat Devgire

Nashik BJP News: प्रतिस्पर्धी आणि विरोधकांच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देणे हे या त्या पक्षाच्या नेत्यांचे आवडते काम होते. असा प्रवेश झाल्यावर विरोधकांना हिनविण्याचे काम देखील भाजप करीत असत. मात्र हेच पक्षांतर आता भाजपच्या नेत्यांना अस्वस्थ करू लागला आहे.

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांना उमेदवारीची संधी मिळाली नाही. यातील अनेकांनी बंडखोरी करीत महाविकास आघाडीची उमेदवारी केली. या उमेदवारांना भाजपमधील अनेक नेत्यांनी आणि नगरसेवकांनी कुठे छुपी तर कुठे उघडपणे मदत केली.

विधानसभेत अपेक्षित योजना मिळाल्यामुळे भाजप पासून दुरावलेले अनेक नेते सध्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. या नेत्यांचा पूर्वीपासून वरिष्ठ नेत्यांची अतिशय चांगला संपर्क आहे. त्यामुळे वरिष्ठ नेते देखील त्यांच्याविषयी सहानुभूतीने वागत आहेत. याचमुळे स्थानिक पदाधिकारी मात्र अस्वस्थ झाले ते चित्र आहे. आता त्यासाठी मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे तक्रार केली जाणार आहे.

विधानसभेत बंडखोरी केलेल्या आणि बंडखोरांची संधान बांधलेल्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यास निष्ठावंत यांची कोंडी होणार आहे. बंडखोरांच्या संपर्कात असलेले अनेक माजी नगरसेवक अतिशय प्रभावी आणि संपन्न आहेत. त्यामुळे महापालिकेत उमेदवारी मिळविण्यासाठी देखील त्यांच्या मार्गात फारसे अडथळे नाहीत.

नाशिक महापालिकेची निवडणूक येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यात भाजपच्या बंडखोरांना प्रवेश दिला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. हे अस्वस्थ पदाधिकारी आता थेट भाजपचे संपर्क मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत बंडखोरांना पक्षात पुन्हा प्रवेश देऊ नये, असा त्यांचा दावा आहे. याला मंत्री महाजन किती प्रतिसाद देतात हा देखील उत्सुकतेचा विषय आहे.

विधानसभा निवडणुकीत सर्वच बुथवर महायुतीच्या उमेदवारांना चांगली मते मिळाली आहेत. त्यामुळे नाशिक शहरात तीनही आमदार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. यामध्ये लाडकी बहीण योजनेपासून अनेक कारणे या विजयाला कारणीभूत ठरली.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मते मात्र जेथे बंडखोर सक्रिय होते. तेथे भाजपला मताधिक्य आहे त्यामुळे बंडखोरांच्या मदतीशिवाय पक्षाला चांगले यश मिळाले आहे. अशा स्थितीत निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच आगामी महापालिकेच्या निवडणुकीत स्थान द्यावे, असा त्यांचा दावा आहे. या पदाधिकाऱ्यांची क्षमता किती हा वादाचा विषय आहे.

भाजप बंडखोरांचा वरिष्ठ नेत्यांची संपर्क आणि प्रवेशाची चर्चा नाशिक शहरात भाजपच्या प्रत्येक इच्छुकांना अस्वस्थ करीत असल्याचे चित्र आहे. त्यात वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT