Manoj Jarange, Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan : जरांगेंच्या आंदोलनाला महाजनांचा 10 दिवसांच्या ‘ब्रेक’चा सल्ला; जरांगे ऐकणार की धडक देणारच?

Girish Mahajan Appeals to Manoj Jarange : कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये गणेशोत्सवाचे दहा दिवस आंदोलनाला विराम द्या, त्यानंतर आंदोलन करा अशी विनंती मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली आहे.

Ganesh Sonawane

Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका लवचिक असून सरकारने आंदोलकांच्या तब्बल १४ मागण्या यापूर्वीच मान्य केल्या आहेत. त्यामुळे ‘सर्व मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सोडणार नाही,’अशी ताठर भूमिका घेणे योग्य नसल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. त्याचसोबत संकटमोचक गिरीश महाजन यांनी जरांगेंना एक विनंती वजा आवाहन देखील केले आहे. त्यावर जरांगे पाटील काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

गेल्या १३ दिवसांपासून जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. मुंबईत मराठा मोर्चा धडकणार असे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. आता सुट्टी नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. येत्या 12 सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटीत मराठा बांधवांची बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईत कधी जायचे याचा मुहूर्त ठरणार आहे. त्याची तारीख ठरणार आहे. याविषयीची माहिती जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मुंबईत मराठा आंदोलकांसह जाणार असे त्यांनी सरकारला ठणकावले असताना दुसरीकडे संकटमोचक महाजनांनी त्यांना दहा दिवस आंदोलनाला ब्रेक द्या अशी विनंती केली आहे.

गणेशोत्सवात आंदोलनाला विराम द्यावा असे आवाहन महाजनांनी जरांगे पाटील यांच्यासह इतर सर्वच आंदोलकांना केले आहे. गणेशोत्सव हा सर्वांसाठी श्रद्धेचा आणि उत्साहाचा सण आहे. हा सण शांततेत व मोठ्या उत्साहात साजरा होत असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मराठा, ओबीसी, आदिवासी तसेच एमपीएससीच्या मुंबईतील सर्व आंदोलकांनी गणेशोत्सवाचे दहा दिवस आंदोलनाला विराम द्यावा. त्यानंतर आंदोलने करावीत, असे आवाहन महाजन यांनी केले.

सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. अशा काळात मुंबईत मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाल्यास कायदा व सुव्यवस्थेसह अनेक गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची मोठी गर्दी असते. आंदोलनामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे सर्वांनी संयमाची भूमिका घेत उत्सव शांततेत पार पडू द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान संकटमोचक गिरीश महाजन यांच्या आवाहनाला मनोज जरांगे पाटील कसा प्रतिसाद देतात ते पाहावे लागेल.

राउतांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही

दरम्यान संजय राऊत यांनी मनोज जरांगे यांच्या जिवाला धोका असल्याचा केलेल्या आरोपावर मंत्री महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांच्या वक्तव्याला कोणताही लगाम राहिलेला नाही. ते काहीही आरोप करू शकतात. यापूर्वी तुरुंगात असताना विष दिल्याचाही आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांच्या अशा बेछूट वक्तव्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही, असा टोला महाजनांनी लगावला.

तर कोरडा दुष्काळ जाहीर करण्यावर विचार

राज्यातील पावसाच्या स्थितीबाबत मंत्री महाजन यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत पुरेशा पावसाअभावी पिके करपू लागली आहेत. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास संकट अधिक गंभीर होऊ शकते. गरज पडल्यास कोरडा दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासन विचार करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT