Ganesh Gite News: विधान परिषदेच्या निवडणुकीत नाशिकमधील बंडखोरीने शिवसेनेच्या नेत्यांना चांगलेच दमवले आहे. यासंदर्भात सध्यातरी शिंदेंच्या शिवसेनापक्षाचे दोन मंत्री आणि दोन आमदारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मात्र नेमकी दिशा न मिळाल्याने प्रयत्नांना यश आले नाही.
दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी दोन दिवस नाशिक शहर उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र त्यांच्या मार्गातील भाजपच्या बंडखोरांचा अडथळा दूर झालेला नाही. त्यात अपक्ष गणेश गीते हे मुख्य अडचण बनले आहेत.
महायुतीच्या नेत्यांनी सातत्याने बंडखोरांच्या माघारी साठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. नेते सातत्याने याबाबत विधाने करत आहेत. बंडखोर लवकरच माघार घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मंत्री सामंत यांना नॉट रीचेबल असलेले अपक्ष गणेश गीते हे मात्र प्रत्यक्षात प्रचाराला लागले आहे. त्यांच्या समर्थकांनी आज नाशिक शहर मालेगाव तसेच थेट नाशिक तालुक्यातील मतदारांची संपर्क केला. माघारीच्या सर्व बातम्या तथ्यहीन असल्याचे त्यांनी मतदारांना सांगितले
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक आज मुंबई येथे होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभेच्या उमेदवारा बाबत चर्चा होईल. नाशिक आणि जळगाव सह अन्य बंडखोऱ्यांबाबतचे अधिकृत भूमिका यावेळी जाहीर होऊ शकते.
एकीकडे महायुतीचे नेते बंडखोर उमेदवारी मागे घेतील या अपेक्षेने प्रयत्न करीत आहेत. मध्ये मात्र अपक्ष उमेदवारांनी थेट मतदारांची गाठीभेटी सुरू केल्या आहेत. त्यांच्या या प्रचारात थेट महायुतीच्याच काही नेत्यांनी हातभार लावला आहे. त्यामुळे नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत आता रंग भरण्यास सुरुवात झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.