MLA Hiraman Khoskar with Governer Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आदिवासी तालुक्याच्या प्रगतीसाठी राज्यपालांनी लक्ष घालावे

आमदार हिरामण खोसकर यांनी मतदारसंघातील प्रश्नांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन दिले.

Sampat Devgire

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील वीज व तालुक्यातील बेरोजगारीच्या प्रश्नावर राज्यपाल (Governer) भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshiyari) यांना इगतपुरी तालुका कॉंग्रेसतर्फे (Congress) सविस्तर निवेदन देऊन चर्चा केली. आदिवासी तालुक्याच्या प्रगतीबाबत राज्यपालांनी लक्ष घालून विविध प्रश्‍न सोडवावेत अशी मागणी आमदार हिरामण खोसकर यांनी निवेदनात केली.

काँग्रेस नेते अँड. संदीप गुळवे, इगतपुरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव आणि आमदार खोसकर यांनी निवेदन दिले. विविध प्रश्‍न मांडले. राज्यपालांबरोबर सकारात्मक चर्चाही झाल्याची माहिती तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी दिली. इगतपुरी तालुक्यातील हळदीच्या शेतीला भेट देण्यासाठी आज राज्यपाल कोश्यारी आले होते. विश्रागृहावर राज्यपालांचे आगमन झाल्यानंतर आमदार खोसकर यांनी गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

आमदार खोसकर यांनी मतदारसंघाबाबत माहिती दिली. आमदार खोसकरांच्या नावाबाबत राज्यपालांनी 'हिरामणी खूषकर'असे नवीन नामकरण केले. इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांवर सद्या वीजप्रश्नाचे मोठे संकट असून यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याचे सांगत वीजप्रश्नी लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह इगतपुरी तालुक्यातील बहुतांश क्षेत्र हे शासकीय प्रकल्पांसाठी संपादित झाल्याने उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे याकडे राज्यापालांचे लक्ष वेधण्यात आले.

प्रकल्पग्रस्त इगतपुरी तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या प्रश्नावर योग्य तो तोडगा निघावा, स्थानिक उद्योगात त्यांना प्राधान्य मिळावे आदी प्रश्नांसह राज्यपालांशी सकारात्मक चर्चा झाली. याबाबत तोडगा काढण्यासाठी शासनस्तरावर कार्यवाही करण्याबाबत राज्यपाल कोश्यारी यांना सकारात्मक आश्‍वासन दिले अशी माहिती काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी दिली.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT