Government Employees Rally Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Old Pension News: रॅलीमुळे शहर दोन तास ठप्प... कर्मचारी म्हणाले सॉरी!

हजारो कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून `एकच मिशन, जुनी पेन्शन` असा एल्गार केला.

Sampat Devgire

Nashik News: जुन्या पेन्शनसाठी (Old Pension) संपावर (Strike) गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी (Government) आज तिसऱ्या दिवशी शहरात रॅली काढली. हजारो कर्मचारी रॅलीत उतरल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली. त्याबाबत `सॉरी` घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी `एकच मिशन जुनी पेन्शन` अशा घोषणा देत संपावर ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त केला. (Old pension action committee firm on strike for pension)

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस होता. सकाळी जिल्हाभरातील विविध विभाग व शाखांचे कर्मचारी गोल्फ क्लब मैदानावर एकत्र जमले. या हजारो कर्मचाऱ्यांनी रॅली काढली. त्यात हजारो कर्मचारी `एकच मिशन जुनी पेन्शन` अशा घोषणा लिहिलेल्या टोप्या व फलक घेऊन सहभागी झाले. या मागणीवर ठाम असल्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.

आज सकाळी अकराला ही रॅली सुरु झाली. गोल्फ क्लब, त्र्यंबक नाका, गंजमाळ सिग्नल, शालीमार, शिवाजी रोड मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे रॅलीचा समारोप झाला. यावेळी शिवाजी रोडवर हजारो कर्मचाऱ्यांच्या गर्दी व त्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. डॉ. आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर मोर्चाचा समारोप झाला.

जुनी पेन्शन समिती कृती समितीच्या व राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश वाघ, यांसह श्यामसुंदर जोशी, तुषार नागरे, ज्ञानेश्वर कासार, राजेंद्र अहिरे, तलाठी संघटनेचे नीळकंठ उगले. रवी पवार, जिल्हा परिषद महासंघाचे अरूण आहेर, दिलीप थेटे, शिक्षक संघाचे नेते माजी आमदार नाना बोरस्ते आदींसह विविध नेते सहभागी झाले होते. त्यांनी या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

राज्य शासनाला दोन महिन्यांपूर्वी नोटीस देऊन हा संप होत आहे. राज्य शासन याबाबत स्पष्ट भूमिका घेत नाही. लाखो कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेचा व जीवन मरणाचा हा विषय आहे. नवीन पेन्सन योजना ही शुद्ध फसवणूक आहे. दिड ते दोन हजार रुपयांच्या पेन्सनवर कर्मचारी कसा जगु शकतो, याचा विचार कोणीच का करीत नाही. याबाबत सरकारने आता आमची मागणी मान्य करावी, त्यात नव्या अडचणी निर्माण करू नये, असा इशारा देऊन संपावर ठाम असल्याचे जाहीर करण्यात आले.

सॉरी नाशिककर

या रॅलीमुळे शहरातील वाहतूक ठप्प झाली. जुना आग्रा रोड, त्र्यंबक रोड, शालीमार, महात्मा गांधी रोड व मध्यवर्ती परिसरातील वाहतूक ठप्प झाली. दोन तास ती सुरळीत होऊ शकली नाही. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना अथक परिश्रम करावे लागले. लांबच लांब रांगा या रस्त्यांवर दिसून आल्या. यावेळी बाजुने जाणाऱ्या रॅलीतील कर्मचाऱ्यांनी `सॉरी` असे फलक घेतले होते. त्यांनी वाहनधारकांना हात जोडत सॉरी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT