Ujjwal Nikam Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bhadgaon Girl Murder Case : उज्ज्वल निकम यांनी मान्य केली भाजप आमदारांची विनंती; 'या' प्रकरणात मांडणार सरकारी पक्षाची बाजू

Jalgaon News : गोंडगाव येथील घटनेप्रकरणी पीडितेच्या आईवडिलांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भेट घेऊन सांत्वन केले.

सरकारनामा ब्यूरो

Jalgaon News : जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न करून तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयात सरकारतर्फे बाजू मांडण्यास ॲड उज्ज्वल निकम यांनी तयारी दर्शविली आहे. ॲड निकम यांना भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी फोन करून सरकारतर्फे बाजू मांडण्याची विनंती केली होती. ती विनंती निकम यांनी मान्य केली आहे. (Government side in Bhadgaon girl murder case to present Adv. Ujjwal Nikam)

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील गोंडगाव येथील घटनेप्रकरणी पीडितेच्या आईवडिलांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भेट घेऊन सांत्वन केले. त्यावेळी आमदार मंगेश चव्हाणही उपस्थित होते. चित्रा वाघ म्हणाल्या की, गोंडगावची घटना अत्यंत क्लेशदायक आहे, अशी विकृती समाजाने ठेचून काढली पाहिजे, त्यासाठी समाजातील सर्वांनी जबाबदारी घेणे गरजेचे आहे. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी अशा नराधम संशयित आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

या वेळी चित्रा वाघ यांच्यासोबत भाजपचे पाचोरा अध्यक्ष अमोल शिंदे, सोमनाथ पाटील, समाधान पाटील, कपिल पाटील कजगावचे भाजप शहराध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी होते.

आमदार चव्हाणांचा ॲड. निकमांना फोन

या वेळी भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना फोन केला. या घटनेची सरकारतर्फे न्यायालयात तुम्ही स्वतः बाजू मांडून न्याय द्यावा, अशी मागणी केली. या वेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीदेखील होकार दिला आहे. सरकारकडून तशी परवानगी मिळवण्यासाठीची जबाबदारी आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT