Amit Deshmukh
Amit Deshmukh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

युक्रेनमधून परतलेल्‍या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत महिन्‍याभरात निर्णय होणार!

Sampat Devgire

नाशिक : युद्धजन्‍य परिस्थितीमुळे युक्रेनहून (Ukrain) परतलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. विद्यार्थ्यांच्‍या पुढील अभ्यासक्रमासाठी उपाययोजना तसेच त्‍यांना भारतीय विद्यापीठात (University) सामावून घेण्यासंदर्भात धोरण निश्‍चित करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी दिली.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभागातर्फे बुधवारी या संदर्भात मुंबईतील विधान भवन येथे अतितातडीची बैठक बोलविण्यात आली होती. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्‍या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस गृहराज्‍यमंत्री सतेज पाटील, अन्न व नागरी पुरवठा राज्‍यमंत्री विश्‍वजित कदम, माजी आमदार सागर मेघे, महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ.माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक व अन्‍य पदाधिकारी उपस्‍थित होते. बैठकीनंतर मंत्री देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधताना माहिती दिली.

मंत्री देशमुख म्‍हणाले, की कुलगुरूंच्या अभ्यासगटाची व्‍याप्‍ती वाढवून सकारात्‍मक दृष्टीने बाबींची तपासणी केली जात आहे. येत्‍या महिन्‍याभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्‍याही परिस्थितीत युक्रेनमधून परतलेल्‍या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही.

राज्‍यातील अडीचशे विद्यार्थी

युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील अडीचशे विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून त्‍यांच्‍याशी संवाद साधण्यात आला असल्‍याचेही श्री.देशमुख यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT