Radhakrishna Vikhe Patil - Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe Patil - Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gram Panchayat Elections : थोरात-विखे सामना पुन्हा रंगणार; तालुक्यातील वर्चस्वासाठी दोन्ही गट मैदानात

सरकारनामा ब्यूरो

Gram Panchayat Elections : राज्यात सात हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडत आहेत. यासाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवरच राज्यातील अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या पार्श्वभूमीवरच अहमदनगर जिल्ह्यात जवळपास २०३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.

यामध्ये संगमनेर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका असून या निवडणुकीमध्ये विखे विरुद्ध थोरात गट असा सामना रंगणार आहे. तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका जरी असल्या तरी देखील यासाठी विखे-थोरातांनी कंबर कसली आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या पक्षाच्या निवडून कशा येतील? यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. आता तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका (Gram Panchayat Elections) असल्याने विखे-थोरात पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. संगमनेर (Sangamner) तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीमध्ये दोन्ही गटाकडून निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात हे याआधी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी देखील जिल्ह्यात विखे विरुद्ध थोरात असा सामना पाहायला मिळायचा. मात्र आता राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये (BJP) तर थोरात हे काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे यावेळी होणारी लढत ही जास्त रंगतदार असणार असून या दोन्ही गटापैकी कोण बाजी मारणार? हे मात्र २० डिसेंबरलाच समोर येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT