Maharashtra Sugar Factory Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Sugar Factory : कोल्हे, थोपटेंसह विरोधकांना कडू डोस; राज्य सरकारकडून साखर कारखान्यांची कर्जकोंडी

Pradeep Pendhare

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत साखर पट्ट्यात झालेला पराभव भाजपला चांगला जिव्हारी लागला आहे. विशेष करून बारातमी आणि अहमदनगरमध्ये झालेला पराभव भाजप विसरू शकत नाही. यामुळे या पट्ट्यातील विरोधकांच्या साखर कारखान्यांना मंजूर झालेले कर्ज रोखण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.

यात अहमदनगरमधील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे (कोपरगाव) आणि काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड साखर कारखान्याचे कर्ज रोखण्यात आलं आहे. या सर्वामागे आगामी विधानसभा निवडणुकीचे गणिते आखली जात आहेत.

लोकसभा निवडणुकीत सारख पट्ट्यात भाजपला (BJP) पराभव झाला. इथेनाॅल निर्मितीवरील बंदी आणि साखर कारखान्यांच्या कर्ज मंजुरीला झालेल्या विलंबाचा फटका, अशी यामागची कारणे आहेत. पंरतु विधानसभा निवडणुकीला समोरे जाताना भाजप सरकार अलर्ट झाली आहे. साखर कारखानदारांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या माध्यमातून 13 कारखान्यांच्या 1898 कोटी रुपयांच्या कर्ज प्रस्तावास केंद्राने काही दिवसांपूर्वी मान्यता दिली.

यात भाजपचे 5, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे 7 आणि काँग्रेसच्या एका आमदाराच्या कारखान्याचा समावेश होता. पात्र कारखान्यांना या कर्जाचे वितरण होणार होते. परंतु लोकसभा निवडणुकीत या कारखानदारांनी दिलेली आश्वासन पाळली नाही असा मुद्दा महायुतीमधील विशेष करून भाजप नेत्यांनी विरोधकांच्या कारखान्यांच्या मंजूर कर्जावरून नाराजीचा सूर आवळला. त्यामुळे 13 कारखान्यांतून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे (कोपरगाव) 125 कोटी आणि काँग्रेसचे भोरचे (जि. पुणे) आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड साखर कारखान्यास मंजूर झालेले 80 कोटी रुपयांचे कर्ज रोखण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

विधानसभा निडवणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकार सर्व काही करत आहे. राष्ट्रीय सहाकार विकास निगमकडे नव्याने चार कारखान्यांना सरकारहमीवर कर्ज मिळवून देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. चार साखर कारखान्यांचे मार्जिन मनी कर्जाला थकहमी देण्याचा निर्णयही सरकारने घेतला असून, याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्य सहकारी बँकेच्या जप्तीपासून वाचण्यासाठी शरद पवार यांची साथ सोडणारे पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना महायुती सरकारने बक्षिस दिलं आहे. त्यांच्या कारखान्यास 300 कोटी रुपयांचे मार्जिन मनी लोक देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच सांगलीतील नाथनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवाडी यांच्या कारखान्यास 148 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यास येणार आहे.

महायुतीकडून एकप्रकारे या दोघांना हे बक्षिस आहे. भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या ताब्यातील किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखान्यास आणखी 22 कोटी रुपयांचे मार्जिन मनी लोक देण्यात येणार आहे. तसेच महायुतीच्या संपर्कात असलेल्या सहकारी कारखानदारांना योजनांचा लाभ देण्याचा सपाटा महायुती सरकारने घातला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT