Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat: जीएसटीचा भस्मासुर जनतेला लुटतोय

बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसतर्फे आझादी की गौरव पद यात्रा.

Sampat Devgire

नंदुरबार : केंद्र सरकारने (Centre Government) खोटे आश्‍वासने देऊन थापा मारत धर्माच्या (religion) नावावर देशाचे विभाजन (Dividation of nation) करण्याचे प्रयत्न केले. पेट्रोल, डिझेलसह जीएसटीचा (GST) भस्मासुर जनतेला लुटतोय, एवढेच काय दुध आणि पिठावरही कर बसविणाऱ्यांनो तुम्हाला परत जावे लागेल. जनता हे काम आगामी काळात करेल, असे मत माजी महसूल मंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी येथे केले. (People are in trouble due to Centre government`s tax burden)

काँग्रेसतर्फे आज स्वातंत्र्य लढ्यातील शहीदांना व माजी सैनिकांना वंदन करण्यासाठी आझादी की गौरव पद यात्रा काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी मंचावर माजी मंत्री तथा आमदार ॲड. के. सी. पाडवी, आमदार डॉ. भास्कर तांबे, माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी, जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक राजाराम पानगव्हाणे, आमदार शिरीषकुमार नाईक, निरीक्षक डॉ. रणजित पावरा, जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, सभापती रतन पाडवी, दीपक नाईक, काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक आदी उपस्थित होते.

शहरातील बसस्थानक, नेहरू चौक, गांधी चौक, हाट दरवाजा, मार्गे हुतात्मा शहीद शिरीषकुमार स्मारकास अभिवादन करीत ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरापर्यंत आली. पदयात्रेचे रूपांतर नाट्य गृहात कार्यकर्ता मेळाव्यात झाले.

श्री. थोरात म्हणाले, देशाचा स्वातंत्र्याचा विजय सांगण्याचे काम काँग्रेसने केले आहे. नंदुरबार हा इंदिरा गांधी यांचा आवडता जिल्हा आहे. त्यामुळे येथे ही पदयात्रा काढली. काँग्रसने संतांचा विचारांवरील समता, बंधुता, एकता दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेच्या आधारावर काँग्रेसने आजपर्यंत समान न्या, समान हक्क, महिला-पुरूष समानता ,धार्मिक एकता टिकवून ठेवण्याचे काम केले आहे. मात्र २०१४ पासून परिस्थिती बदलली असल्याचे त्यांनी नमूद केले. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी मनोगत व्यक्त केले.

माजी ॲड. के. सी. पाडवी म्हणाले, काँग्रेसने आदिवासींसाठी खूप दिले आहे. ते नाकारू शकत नाहीत. केंद्र सरकार आदिवासींचे हक्क हिरावण्याचे काम ते करीत आहेत. त्यामुळे आदिवासी समाजाने नेहमी काँग्रेसला साथ दिली आहे. ती यापुढेही कायम द्यावी, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दिलीप नाईक यांनी प्रास्ताविक केले. आमदार शिरीषकुमार नाईक यांनी आभार मानले.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT