Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse News : नाशिकच्या विकासाचे मार्केटिंग करा

नाशिक येथे झालेल्या क्रेडाईच्या परिषदेत पालकमंत्री दादा भुसे यांनी शहराच्या विस्ताराला मोठा वाव असल्याते सांगितले.

Sampat Devgire

Nashik Devolopment issue News : नाशिक शहराला विकासाच्या अनेक संधी आहेत. त्याचा योग्य उपयोग करून येथील संस्थांनी त्याच्या विस्ताराला व विकासाला चालना मिळेल असे काम करावे. नाशिकच्या संधी व सुविधांचे योग्य मार्केटींग करावे त्याचा उद्योग, व्यवसाय व रोजगार वृध्दीला निश्चितच लाभ होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. (Port development minister Dada Bhuse appriciate credai`s Effort)

क्रेडाई नाशिक (Nashik) मेट्रोतर्फे हॉटेल ताज येथे झालेल्या पदग्रहण समारंभाप्रसंगी मंत्री विखे पाटील (Dr. Radhakrishna Vikhe-Patil) प्रमुख पाहुणे होते. यावेळी त्यांनी शासनाच्या (Maharashtra Government) उत्पन्नवाढीत बांधकाम व्यावसायिकांचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच हा विचार करून या वर्षी रेडीरेकनरचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. बांधकाम क्षेत्राला चालना मिळाली पाहिजे, हे शासनाचे धोरण आहे, असे सांगितले.

यावेळी पालकमंत्री भुसे म्हणाले, देशात कॉलिटी शहरांमध्ये नाशिक पाचव्या स्थानावर आले आहे. त्या अनुषंगाने स्वच्छता विकास, कौशल्य व शिक्षण या तीन विषयांवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. ही तिन्ही क्षेत्रे नाशिक मॉडेल म्हणून विकसित केले जाणार आहे.

शासनाकडून निधीची कमतरता पडू देणार नाही. २०२४ मध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या पन्नास हजारांपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाशिक संदर्भातील घरपट्टी, रिंगरोड, तसेच सिंहस्थ कुंभमेळा निधी यासंदर्भातील निर्माण होणारे प्रश्न सोडण्यासाठी एक दिवस नाशिकच्या विकासासाठी शासनाकडून देण्याचे नियोजन आहे.

नाशिकच्या विकासाचा आराखडा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासमोर ठेवला जाणार असून, नाशिकच्या विकासाचे मार्केटिंग करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन श्री. भुसे यांनी केले. आमदार सत्यजित तांबे म्हणाले, ‘मुंबई पुण्याच्या तुलनेत नाशिकची प्रगती झालेली नाही. त्यामुळे भविष्यात नाशिकच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.’

सामाजिक योगदान

क्रेडाईचे माजी अध्यक्ष जितूभाई ठक्कर म्हणाले, ‘क्रेडाईची जन्मभूमी नाशिक आहे. सामाजिक कार्यात देखील क्रेडाईचे मोठे योगदान आहे. कोविड सेंटर उभारणी करून क्रेडाईने हे सिद्ध केले आहे. या काळात एकही मृत्यू कोविड सेंटरमध्ये झाला नाही. शंभर टक्के रुग्ण बरे झाली आहेत. क्रेडाईचे माजी अध्यक्ष सुनील कोतवाल, महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, अनंत राजेगावकर यांनी मार्गदर्शन केले. माजी अध्यक्ष रवी महाजन यांनी बांधकाम व्यावसायिकांची सेवा करण्याचा आनंद मिळाल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT