Gulabrao Patil |
Gulabrao Patil | 
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Politics| गुलाबराव पाटलांना चांगल्या खात्याचा मोह सुटेना; मनातली खद्खद् ओठांवर...

सरकारनामा ब्युरो

जळगाव : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शिंदे गटातील मंत्र्यांची ही नाराजी अनेकदा समोरही आली आहे. चांगल्या खात्यासाठी आग्रह धरला असता तर यापेक्षाही चांगलं खातं मिळालं असतं, चां असं वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलं आहे.

जळगाव जिल्ह्यातील फुलगाव येथे पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनाप्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. चांगल्या खात्यासाठी आग्रह धरला असता तर यापेक्षाही चांगलं खातं मिळालं असतं, पण जे चाललंय ते चालू द्या, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे चांगल्या खात्याची अपेक्षा केली आहे. तसेच, काही लोकांना ठराव माहिती नसतो तेसुद्धा आम्ही योजना मंजूर करून आणल्याचे सांगतात. पण बाळ जन्माला आम्ही घालायचं आणि बारसं तुम्ही करायचं हा यांचा धंदाच आहे, असी टीकाही गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

या कार्यक्रमानंतर गुलाबराव पाटील यांनी धुळ्यात सभा घेतली. इथेही त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. दोन दिवसांपूर्वी दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे सेवक चंपासिंग थापा यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. पण आता उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मिलींद नार्वेकरही शिंदे गटात येणार असल्याचा खुलासा त्यांनी केला. मी 50 खोके घेतल्याचा आरोप माझ्यावर केला जात आहे. पण चंपासिंग थापाने काय केलं? ज्या थापाने आयुष्य बाळासाहेबांची सेवा केली, तो देखील यांना सोडून आला. थापा गेला, आता मिलिंद नार्वेकर येत आहेत, असंही गुलाबराव पाटलांनी म्हटलं.

दरम्यान या कार्यक्रमाच्या आधी धुळ्यात काही संतप्त शिवसैनिकांनी गुलाबराव पाटलांची गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला. मंत्री झाल्यानंतर पाटील पहिल्यांदाच धुळे दौऱ्यावर आले होते. शिंदे गटाच्या दसरा मेळावाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा मेळावा होता. पण धुळे रस्त्यावर पारोळा चौफुलीवर खोके दाखवत शिवसैनिकांनी गुलाबराव पाटलांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आक्रमक शिवसैनिकांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT