Gulabrao Patil
Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

गुलाबराव पाटील यांवी ठाकरे गटाचा धसका घेतला?

Sampat Devgire

मुक्ताईनगर : जिल्हा (Jalgaon) प्रशासनाने (Administration) महाप्रबोधन यात्रेला परवानगी नाकारूनही सभागृहात सभा घेण्याची तयारी करणाऱ्या शिवसेना (Shivsena) कार्यकर्त्यांवर पोलिसांनी (Police action) कारवाई केली आहे. एकंदरच शिलसेनेच्या आक्रमकतेमुळे (Aggressive Shivsena) पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेनेचा चांगलाच धसका (Shock) घेतल्याचा संदेश कार्यकर्ते व नागरिकांत जात आहे. (Guardian Minister Gulabrao Patil have taken political shock ofaggressive Shivsena)

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या आक्रमक टिकेमुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील चांगलेच अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या सभेला परवानगी नाकारली असा आरोप होत आहे. यावर राजकारण चांगलेच तापले आहे.

मुक्ताईनगरातील महाप्रबोधन यात्रा आणि महाआरती या दोन्ही कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली. यानंतर शुक्रवारी (ता. ४) सकाळपासूनच शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाप्रबोधन सभेच्या ठिकाणीच ठाण मांडले. काहीही झाले तरी सभा होणारच असल्याचा त्यांचा पवित्रा होता. तथापि, दुपारी सभेसाठी लागलेले व्यासपीठ आणि अन्य बाबी हटविण्यात आल्या.

यानंतर संपर्कप्रमुख विलास पारकर, जिल्हाप्रमुख डॉ. मनोहर पाटील, जिल्हा संघटक गजानन मालपुरे आदी पदाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर गाठले. त्यांनी युवासेना उपजिल्हा प्रमुख पवन सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह वार्तालाप केला. यानंतर शहरातील गोदावरी मंगल कार्यालयातील हॉलमध्ये सभा घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तथापि, पोलिसांनी याला देखील परवानगी नाकारली.

याप्रसंगी शिवसेना कार्यकर्ते आणि पोलिस प्रशासनामध्ये शाब्दिक वाद देखील झाले. अखेर पाचच्या सुमारास पोलिस प्रशासनाने शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या सर्वांना पोलिस ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी सुरू होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये पक्षाचे संपर्कप्रमुख विलास पारकर, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, जिल्हाप्रमुख डॉ. मनोहर पाटील, दीपकसिंग राजपूत व समाधान महाजन, ज्येष्ठ पदाधिकारी मनोहर खैरनार, युवासेना उपजिल्हा प्रमुख पवन सोनवणे आदींचा समावेश होता.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT