Sanjay Raut| Gukabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gulabrao Patil 400 crore scam: राजकारण तापलं! 'गुलाबराव पाटलांनी कोरोना काळात ४०० कोटींचा घोटाळा केला; राऊतांचा गंभीर आरोप

Jalgaon Politcs| गुलाबराव पाटलांनी कोरोना काळात ४०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

सरकारनामा ब्युरो

Sanjay Raut On Gulabrao Patil: जळगावाच्या पाचोऱ्यात आज (२३ एप्रिल) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सभा होत आहे. पण सभेपूर्वीच मंत्री गुलाबराव पाटील आणि खासदार संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोप प्रत्यारोपांमुळे जळगावचं राजकीय वातावरण तापलं आहे. संजय राऊतांनी गुलाबराव पाटलांवर 400 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केला असून त्याचे सर्व कागदपत्र माझ्याकडे असल्याचा दावाही राऊतांनी केला आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"कोरोना महामारी काळात जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे माझ्याकडे आहेत. कोरोना काळात पालकमंत्रीआणि जिल्हा नियोजन समितीचे प्रमुख म्हणून गुलाबराव पाटलांनी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, कॉट, गाद्या, औषधांची, चढ्या भावाने बेफाम खरेदी केली दोन लाखांचे व्हेंटिलेटर 15 लाखात खरेदी केले. जिल्ह्यातील रुग्णांचे जीव वाचवण्यापेक्षा गुलाबराव पाटील प्रत्येकावर दबाव आणून खरेदी करुनकरत होते.असा आरोपच संजय राऊतांनी केला आहे.

हे एक प्रकरण नाहीये,ही गुलाबो गँग आहे. आधी लुटमार, भ्रष्टाचार करायचा आणि नंतर प्रामाणिक पणाच्या गोष्टी करायच्या, अशी असंख्य प्रकरणे आहेत. आमच्याकडे पुरावेही आहेत. गुलाबराव गँगचेच एक मेंबर आहेत. चिमणराव पाटील, यांनीच त्यांच्यावर आधी आक्षेप घेतला. पण नंतर ते त्यांच्याच गँगमध्ये सामील झाले. कोरोना काळात झालेल्या घोटाळ्यांची चौकशी करा, अशी मागणी चिमणराव पाटलांनीच केली होती. विधीमंडळाच्या दोन्ही सभाग-हात हे प्रश्न विचारले पण ते प्रकरण दाबून टाकण्यात आले. (Jalgaon Politics)

माझं देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे. आज भ्रष्टाचारी लफंगे खुप खुष आहेत, की आपला बाप आला. मी राहुल कुल यांच्याही ५०० कोटींच्या रुपयांच्या मनी लॉन्ड्रिगचे केस त्यांच्याकडे पाठवली आहे. पुराव्यापासून ऑडिट रिपोर्टसह त्यांच्याकडे पुरावे पाठवलेत, त्यांच्यावर करा ना कारवाई. शेतकऱ्यांचा पैसा कसा लुटला, भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात, गरीबांचा पैशांची लुट करण्यात आली. काय केलं गृहमंत्र्यांनी, कोण तुम्हाला घाबरतयं, तुम्हीच प्रकरणं दाबत आहात, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

मंत्री दादा भुसे, गिरणा सहकारी साखर कारखाना बचाव या नावाखाली १८०० कोटी रुपये गोळा केल्याचे पुरावे आहेत. काय केलं तुम्ही त्या पैशाचं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीसांकडे गेल्या पाच महिन्या अनेक प्रकरणं पाठवली, पण फडवीसांनी काय केलं, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT