Gulabrao Patil
Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

बंडखोर गुलाबराव पाटील यांचा पराभव करणारच!

Sampat Devgire

जळगाव : जिल्ह्याचे (Jalgaon) पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) मराठा (Maratha) समाजात फूट पाडण्याचे राजकारण करीत आहे. आगामी २०२४ च्या निवडणुकीत ते जळगाव ग्रामीणमधून निवडूण येणारच नाहीत, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे (Uddhav Thackerey group) रमेश माणिक पाटील (Ramesh Patil) यांनी पत्रकार परिषदेत केला. (Ramesh patil criticised Minister Gulabrao Patil on Maratha issue)

रमेश पाटील यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे रमेश माणिक पाटील यांनी शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे आदी उपस्थित होते.

रमेश पाटील म्हणाले, की पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मराठा समाजाच्या काही जणांना आपल्याविरुध्द पत्रकार परिषद घेण्यास दबाव आणून भाग पाडले. मंत्री पाटील यांचे मराठा समाजात फूट पाडण्याचे राजकारण यशस्वी होऊ देणार नाही.

ते म्हणाले, गुलाबराव पाटील यांच्या पायाखालची वाळू आता सरकू लागली आहे. त्यामुळे ते असे राजकारण करीत आहेत. एकेकाळी खानदेशची मुलूख मैदान तोफ असलेले गुलाबराव आता ‘पिपाणी’ झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत ते हमखास पराभूत होतील किंवा ते निवडणुकीचे मैदान सोडून पळून जातील, असा दावाही त्यांनी केला. मंत्री पाटील यांनी पाळधी गावात पीएसआयची नियुक्ती केली आहे.

श्री. पाटील म्हणाले, आपल्या विरोधकांना त्या पोलिस अधिकाऱ्यामार्फत भर चौकात ठोकून घेतले जाते. या अधिकाऱ्यांना आता ५० जणांना भर चौकात मारले. ते सर्व गुलाबरावांचे विरोधक होते. याच अधिकाऱ्याने भरचौकात मारहाण केलेले धार येथील आनंदा नारायण पाटील यांनी आत्महत्या केली.

आनंदा पाटील यांच्या पत्नीने आरोप करून जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे चौकशीची मागणीही केली. मात्र, मंत्री पाटील यांनी ती दडपून त्या पोलिस अधिकाऱ्याला रजेवर पाठवून अभय दिले आहे. मराठा समाजाचा अपमान करणारे पोलिस अधिकारी बकाले यांना अटक का होत नाही, याचे उत्तरही मंत्री पाटील यांनी द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले. आगामी काळात आपण पत्रकार परिषद घेऊन मंत्री गुलाबराव पाटील यांचे कारनामे जनतेसमोर उघड करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT