EknathKhadse-gulabraoPatil
EknathKhadse-gulabraoPatil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

एकनाथ खडसे लावणाऱ्या सीडीची गुलाबराव पाटलांनाही उत्सुकता!

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे. जे काय आहे, ते तपासात निष्पन्न होईल. मात्र सद्या ईडीचे ब्रह्मास्त्र वांरवार वापरून बोथट केले जात आहे, असा आरोप राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. राज ठाकरे यांनी ओला दुष्काळाची मागणी करणे, यात काही विशेष नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले. (Gulabrao Patil's reaction regarding ED's action against Eknath Khadse)

गुलाबराव पाटील हे सद्या नाशिक दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एकनाथ खडसे यांना ईडीने ताब्यात घेतले, त्यांच्या घरावर नोटीस बजावली, अशी चर्चा काल सुरू होती. या बाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, खडसे काल जळगावात होते, याची मला माहिती होती. मात्र, मी नाशिककडे निघाल्यानंतर मला सायंकाळी पत्रकारांच्या माध्यमातून समजले ते घरी नाहीत. परंतु त्यांनी (भाजपने) माझ्या मागे ईडी लावली, तर मी सीडी लावेन, असे खडसे म्हणाले होते. त्यामुळे बघूया पुढे काय होते ते. ईडी प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांचे जावई कारागृहात आहेत. या प्रकरणी कायद्यानुसार चौकशी होईल, जे दोषी असतील, त्यांना शिक्षा होईल, जे दोषी नसतील, ते बाहेर राहतील.

केंद्र सद्या ईडी चा गैरवापर करते आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, होय ईडीचा सर्रास गैरवापर होत आहे. पोलिस ज्याप्रमाणे एलसीबीचा वापर करतात, त्या प्रमाणे हा वापर होत आहे. मात्र सतत वापरामुळे ईडी चे म्हहत्व कमी होईल, त्यामुळे त्याचा दरारा कमी होईल. कारण ईडी हे ब्रह्मास्त्र आहे. पुराणकाळात ज्या वेळी राक्षस मातला जाई, त्यावेळी देव ब्रह्मास्त्र बाहेर काढत होते. आता केंद्र सरकार या ब्रह्मास्त्रचा उपयोग सर्रास गैरवापर करीत आहे, हे चुकीचे आहे.

अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीबाबत बोलताना ते म्हणाले की, सद्या नुकसानीची मालिका सुरू आहे, त्या मुळे जळगाव जिल्ह्यात पंचनामे करण्यास अडचण येत आहेत. मात्र पंचनाम्याचा एकत्रित आकडा आल्याशिवाय मदत जाहीर करणे कठीण आहे. मात्र आम्ही मदत देण्यासाठी कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार आहोत.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या राज ठाकरेंच्या मागणी बाबत बोलताना ते म्हणाले, ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, त्या ठिकाणी तो जाहीर होईलच त्यामुळे राज ठाकरे यांनी मागणी केली ही काय मोठी गोष्ट नाही. ज्या ठिकाणी ६५ मिलीमीटर पाऊस झाला, त्या ठिकाणी ओला दुष्काळ होतो, हे आता शेतकऱ्यांना माहीत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT