Nilesh Rane & Harshvardhan Sapkal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress on Maratha reservation: हर्षवर्धन सपकाळ यांचा नितेश राणेंना टोला, म्हणाले, 'आधी आपल्या वडिलांशी बोला'

Harshvardhan Sapkal; Congress leader Harshvardhan Sapkal's attack on Nitesh Rane, Nitesh Rane should consult his father before talk-काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ झाले आक्रमक, म्हणाले, तर भाजपने सत्ता सोडलेलीच बरी

Sampat Devgire

Harshvardhan Sapkal News: मुंबईत मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी या विषयावर आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. राज्यभरातून हजारो आंदोलक आझाद मैदानात जमा झाले आहेत.

यासंदर्भात महायुती सरकार वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. श्री सपकाळ यांनी भाजपला मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर थेट आव्हान दिले.

मराठा आरक्षण आंदोलनावर टीका करणाऱ्या मंत्री नितेश राणे त्यांचाही हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगलाच समाचार घेतला. नितेश राणे यांनी वक्तव्य करण्याआधी आपल्या वडिलांची चर्चा केलेली बरी राहील. कारण त्यांचे वडील नारायण राणे हे देखील मराठा समाजाला आरक्षणाबाबतच्या एका समितीचे सदस्य होते.

भारतीय जनता पक्ष मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या गंभीर विषयावर वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप आंदोलकांकडून होत आहे. शासकीय यंत्रणादेखील आंदोलकांना वेगवेगळ्या प्रकारे अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. एका गंभीर विषयावरील आंदोलनावर भाजपची ही भूमिका अत्यंत विवादास्पद असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.

या संदर्भात भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकारने तातडीने पावले उचलावीत. संदर्भात राज्य सरकारची भूमिका आणि निर्णय तातडीने घेतला पाहिजे. मराठा आरक्षणाचे आंदोलन चिघळता कामा नये. असे झाल्यास राज्यात चांगला संदेश जाणार नाही.

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आकस्मिक सुरू झालेले नाही, असे सपकाळ म्हणाले. तीन महिने आधी राज्य सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची भूमिका आणि इशारा दिला होता. राज्य सरकारला तीन महिन्यात निर्णय घेता येत नाही तर या सरकारने आंदोलनाच्या तीन दिवसात निर्णय घ्यावा ही अशा करणे भाबडेपणा ठरे. यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न जटिल करायचा आहे, असे जाणवते.

मराठा आरक्षण आंदोलनाच्या प्रश्नावर राज्य शासन जी भूमिका घेत आहे, त्यावर सगळ्यांनाच संभ्रम आहे. मुख्यमंत्र्यांना राज्यात तणाव निर्माण करून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण तर करायचा नाही ना?. शासनाने स्थापन केलेल्या उपसमितीलाही जर निर्णय घेता येत नसेल तर त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे हे स्पष्ट करावे, असे आव्हान सपकाळ यांनी दिले.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT