Hasan Mushrif  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Hasan Mushrif : "गुजरात सोडताच खराब रस्ते सुरू, मला लाज वाटली..."; महायुतीच्या मंत्र्यानेच सांगितली राज्यातील रस्त्यांची दुरावस्था

Hasan Mushrif on Nandurbar Road : मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुरतहून नंदुरबारकडे येताना अनेक ठिकाणी रस्ते खराब असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय गुजरातची हद्द संपल्यानंतर महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करताच रस्त्यांची दुरवस्था जाणवल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Jagdish Patil

Nandurbar News, 16 Aug : नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था पाहून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गुजरातमधून महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर रस्त्यांच्या गुणवत्तेतील फरक स्पष्टपणे जाणवल्याचे सांगत, ही परिस्थिती पाहून आपल्याला लाज वाटल्याचं वक्तव्य त्यांनी केलं.

सुरतहून नंदुरबारकडे येताना अनेक ठिकाणी रस्ते खराब असल्याचे दिसून आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. गुजरातची हद्द संपल्यानंतर महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करताच रस्त्यांची दुरवस्था जाणवल्याचं ते म्हणाले.

हसन मुश्रीफ म्हणाले, "आज मी जे काही पाहिले, ते अत्यंत निराशाजनक आहे. रस्त्यांची अवस्था पाहून मला वाईट वाटले, लाजही वाटली. गुजरात सोडल्यानंतर आपल्या हद्दीतील रस्त्यांची परिस्थिती अतिशय खराब असल्याचे दिसून आले."

जिल्ह्यातील रस्त्यांची कामे दर्जेदार झाली नाहीत आणि त्यावर प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही, तर विकासाला खीळ बसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून रस्त्यांची कामे योग्य पद्धतीने आणि गुणवत्तेचे निकष पाळून करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय पावसाळ्याच्या तोंडावरच रस्ते उखडण्याच्या प्रकाराबाबत संबंधित विभागाला याबाबत जाब विचारला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात अशी परिस्थिती असती, तर आम्ही अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांना जाब विचारल्याशिवाय राहिलो नसतो असं देखील म्हटलं आहे. नंदुरबारचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील विकासकामांकडे विशेष लक्ष देणार असून पावसाळा संपल्यानंतर खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करून जिल्ह्यात दर्जेदार रस्ते उभारण्यासाठी नियोजन केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT