<div class="paragraphs"><p>Subhash Jangda</p></div>

Subhash Jangda

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

`कोरोना`च्या जनजागृतीसाठी ‘ते’ नाशिक ते शिर्डी धावले!

Sampat Devgire

नाशिक : कोरोना विषयक जनजागृती करण्यासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुभाष जांगडा (Subhash Jangda) यांनी शनिवारी शिक ते शिर्डी ९० किलोमीटर अंतर धावत पूर्ण केले. कोरोनातील ऑमिक्रॉन व्हेरीयंटचे (Omicron verient) संकट दूर करण्यासाठी त्यांनी साईबाबांना साकडे घातले. श्री जांगडा यांनी शनिवारी पहाटे पाचला नाशिकहून धावण्यास सुरुवात केली. दुपारी तीनला ते शिर्डीला पोहोचले.

यावेळी त्यांच्या समवेत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ सल्लागार जयपाल शर्मा, राजेश इसर्वाल, राजवीर जांगडा,मोहित जांगडा, राहुल जांगडा, योगिता निकम राजपूत, रुपाली मुंढे, दिनेश जांगडा, नवीन वर्मा आदी सहभागी झाले होते.

गेल्या सहा वर्षापासून श्री. जांगडा हे नाशिक ते शिर्डी विविध सामाजिक संदेश देण्यासाठी धावत असतात. सुभाष जांगडा यांचे यंदाचे सातवे वर्ष असून त्यांनी हे ९० किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण करत कोरोनाविषयक ऑमिक्रॉन या व्हेरीयंटबाबत जनजगृती केली. या अगोदर जांगडा यांनी बेटी बचाव, बेटी पढाओ, स्त्री भृण हत्या, स्वच्छ भारत अभियान, पाणी बचाव मोहीम याबाबत त्यांनी जनजागृती केली आहे. यंदाच्या वर्षी त्यांनी कोरोना विषयक जनजागृती करत कोरोनातीसह ऑमिक्रॉन या व्हेरीयंटचे संकट दूर करण्यासाठी साईचरणी साकडे घातले. कोरोना विषयक दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले. त्यांचे रस्त्यात विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले.

सुभाष जांगडा यांचा परिचय

श्री सुभाष जांगड़ा हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून कोलकत्ता रोडवेजचे ते भागीदार आहे. तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनमध्ये महत्वाच्या पदावर काम पाहत आहे. नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन कडून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. ते स्वत: देखील सामाजिक बांधीलकीतुन नेहमी समाज उपयोगी वेगळे कार्यक्रम राबवित असतात. ते गोल्फ क्लब नाशिकचे सदस्य आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT