Sanjay Bhoi, Jalgaon

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

तो अवघा १७ वर्षाचा...मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत त्याने मृत्यूला कवटाळले!

पिंप्राळ्यातील युवकाने मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

Sampat Devgire

जळगाव : मोबाईलमुळे युवा पिढी हल्ली सेल्फी, फोटो, चित्रीकरण करते. त्यात आता नाविण्य राहिलेले नाही. मात्र येथील एक १७ वर्षीय युवकाने (Youth) आत्महत्या केली. जळगावच्या (Jalgaon) या युवकाने या वेळी त्याने गळफास घेताना स्वतःचे चित्रीकरण (Filming) केल्याने खळबळ उडाली आहे. या आत्महत्येचे (Suicide) गुढ कारण अद्याप समोर न आल्याने तो चर्चेचा विषय बनला.

जळगाव शहरातील पिंप्राळा भागात शुक्रवारी रात्री धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या सतरा वर्षीय तरुणाने मोबाईलमध्ये चित्रीकरण करून गळफास घेत मृत्यूला कवटाळले. घनश्याम भोई (वय १७) असे मयत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे चित्रीकरण मागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

घनश्याम संजय भोई (वय १७) आई- वडील, बहीण अशा कुटुंबीयांसह पिंप्राळ्याच्या सेट्रल बँक कॉलनीत राहत होता. कुटुंबातील इतर सर्व नेरी (जामनेर) येथे नातेवाइकांकडे गेलेले असताना शुक्रवारी रात्री त्याने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार शेजारी महिलेच्या लक्षात आल्याने घटना उघडकीस आली. घटनेची माहिती शेजाऱ्यांनी रामानंदनगर पोलीसांना दिल्यावर पोलिस पथक घटनास्थळावर दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

चित्रीकरणाचे कारण अस्पष्ट

आत्महत्येचे चित्रीकरण कशासाठी केले, याचा मात्र उलगडा झाला नसून पोलिसांनी घनश्यामच्या खोलीतून स्टॅण्डवर लागलेला मोबाईल ताब्यात घेतला. मोबाईलमध्ये गळफास घेतानाचे संपूर्ण चित्रीकरण झाले असून आत्महत्येच्या नेमक्या कारणांचा शोध पोलिस घेत आहे. दाखल गुन्ह्याचा तपास साहाय्यक फौजदार अनमेाल पटेल करत आहेत

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT