नाशिक : चांदवडला दिवसभर एका गावात ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेला संशयित रविवारच्या सुट्टीच्या दिवशी फावल्या वेळेत महिलांच्या गळ्यातील स्त्रीधन ओरबडण्याचा धंदा करायचा असा प्रकार शहर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. त्याच्याकडून रविवारी सुट्याच्या दिवशी त्याने केलेल्या पाच सोनसाखळ्या ओरबडण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
विपुल रमेश पाटील असे संशयिताचे नाव आहे. तो चांदवड तालुक्यात ग्रामसेवक आहे. त्याची पत्नी उच्चशिक्षित असून घरची कौटुंबिक परिस्थिती चांगली आहे. अयोध्यानगर आडगाव येथे रहिवास आहे. दुपारी तेथून शहरात यायचा. त्यानंतर हे गुन्हे करायचा. असे तपासात पुढे आले आहे. तो सुट्टीच्या दिवशी नाशिक शहरात येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या ओरबाडून गुन्हे करायचा, असे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ५ गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच त्याने महिलांच्या गळ्यातील ओरबाडून नेलेल्या विविध गुन्ह्यातील चार लाख ९४ हजार ८५९ रुपयाच्या ११ तोळे वजनाच्या सोन्याच्या लगडी, एक प्लेझर मोपेड स्कूटर असा सुमारे पाच लाख १४ हजार ८५९ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
७९ गुन्ह्याची उकल
पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अमोल तांबे, गंगापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलिसांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या तीन घटनांत अनुक्रमे, ५६, १८ आणि आजच्या पाच याप्रमाणे ७९ सोनसाखळ्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहे. आजच्या गुन्ह्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, उपनिरीक्षक संजय भिसे, हवालदार श्री बोळे, महाले, मोहिते, जाधव, जगताप, भोये आदीच्या पथकाने ही कारवाई केली.
सावरकरनगरला जेरबंद
बुधवारी (ता.१५) पोलिस मित्र नागरीकांनी गंगापूर पोलिस ठाण्यातील नाईक सोळसे आणि अंमलदार जाधव यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली की, सावरकर नगर परिसरात संशयित नंबर प्लेट नसलेल्या प्लेझर स्कूटर वर फिरत असल्याची माहिती दिली. पथकाने आकाशवाणी टॉवर परिसरात सापळा रचून त्याला प्लेझर मोपेडसह ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडील पाच गुन्ह्याची उकल झाली.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.