Dada Bhuse
Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse: मुंबईच्या मेळाव्याला ठाणे नंतर सर्वाधिक कार्यकर्ते नाशिकचे असतील!

Sampat Devgire

नाशिक : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackray) यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी हिंदू गर्व गर्जना या अभियानातंर्गत मुंबईत (Mumbai) बिकेसी मैदानावर दसऱ्याला (Dashahara) मेळावा होणार आहे. या मेळाव्याला ठाणेपाठोपाठ (Thane) नाशिक (Nashik) जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिंदे गटातील शिवसेना (Shivsena) कार्यक्रते उपस्थित राहतील असा निर्धार नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी व्यक्त केला. (Dada bhuse take a party workers meeting in Nashik for Mumbai meeting prepration)

येथील लक्ष्मी लॉन्स येथे शिंदे गटाची बैठक शनिवारी सायंकाळी झाली. पदाधिकारी व कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना श्री. भुसे बोलत होते.

यावेळी पालकमंत्री भुसे म्हणाले, माजी नगरसेवक प्रवीण तिदमे शिंदे गटात दाखल होताच शहरातील ठाकरे गटातील नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते जर दादागिरीची भाषा करीत असेल तर आम्ही कदापि खपवून घेणार नसल्याचे सांगतानाच ज्या गावच्या बाभळी, त्याच गावच्या बोरी देखील असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

ते म्हणाले, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी धडाकेबाज निर्णय घेतले असून, दिवसरात्र पक्ष मजबूत करण्यासाठी काम करीत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी हिंदू गर्व गर्जना या अभियानाच्या माध्यमातून मुंबईत बिकेसी मैदानावर पुढील महिन्यात दसऱ्याच्या दिवशी मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्याला ठाणेपाठोपाठ नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिंदे गटातील शिवसैनिक उपस्थित राहतील.

ते पुढे म्हणाले, शिवतीर्थापेक्षा दोन तीनपट मोठे बिकेसी मैदान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वांना अभिमान वाटेल असे काम करीत असून, त्यांचे हात बळकट करण्यासाठी बिकेसीवर उपस्थित राहायचे असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले. आमदार सुहास कांदे यांनी, बिकेसीवर आपल्याला बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारांचे सोने लुटायचे आहे. त्याठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळेल. गरीब जनतेला तसेच महिलांना न्याय मिळणार असल्याने आपल्याला बिकेसीवर जायचे आहे. हिंदुत्व टिकवण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले असून, पन्नास आमदार व बारा खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले आहेत.

यावेळी संजय माशीलकर, शीतल म्हात्रे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, प्रवीण तिदमे, योगेश म्हस्के, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, पांडुरंग गांगड, अनिल ढिकले, लक्ष्मी ताठे, भाऊलाल तांबे, सीमा पेठकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT