Womens gathering in Malegaon
Womens gathering in Malegaon Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मालेगावमध्ये आज पाळणार हिजाब दिवस!

Sampat Devgire

मालेगाव : शरियतमध्ये (Shariyat) महिला-पुरुषांना समान न्याय दिला आहे. शर्म, हया महिलांचा (Women) स्थायी स्वभाव आहे. हिजाब- बुरखा व पडदा तसेच स्त्री- पुरुषांनी अंगभर कपडे परिधान करणे शरियामध्ये बंधनकारक आहे. कर्नाटक सरकार त्यात हस्तक्षेप करून ड्रेस कोड आणत आहे. त्याच्या निषेधार्थ आज मालेगाव (Malegaon) शहरात आज हिजाब दिवस पाळला जाणार आहे.

जमियत उलेमा ए हिंदतर्फे येथील अजिज कल्लु स्टेडिअमच्या आवारात हिजाबचे समर्थन करण्यासाठी, कर्नाटक शासनाच्या निषेधार्थ महिला मेळावा झाला. यावेळी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल म्हणाले, डोक्यावर टोपी, रुमाल किंवा साफा- फेटा बांधूनच नमाज पठण होते. महिलांच्या इज्जत व अब्रुच्या रक्षणासाठी पुरुष प्राण पणाला लावण्यास तयार असतो. याची जाणीव असताना कर्नाटक राज्यात महाविद्यालयातील ड्रेस कोड आणत आहे, याचा निषेध केला पाहिजे.

यावेळी मेळाव्यात हजारोच्या संख्येने महिला हिजाब- बुरखा परिधान करुन सहभागी झाल्या होत्या. कर्नाटक राज्यात सत्ताधारी भाजपने महाविद्यालयीन विद्यार्थीनींसाठी ड्रेसकोड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या विरोधात कर्नाटकात आंदोलन सुरु आहे. या निर्णयामुळे विद्यार्थीनींना बुरखा- हिजाब घालण्यास प्रतिबंध असल्याने शहरात त्याविषयी मोठा रोष आहे. कर्नाटकमधील आंदोलनाला पाठींबा व भाजप शासनाचा निर्णय रद्द करावा, यासाठी हा महिला मेळावा झाला.

आज हिजाब दिवस पाळण्याचा निर्णय जमियत उलेमा ए हिंदने घेतला आहे. त्याची पूर्वतयारी व महिलांना शरिया कानून हिजाबचे महत्व विषद करण्यासाठी आजचा महिला मेळावा झाला. यात शहरातील पूर्व भागातील विविध प्रभागातून शेकडोच्या जत्थ्याने येऊन महिला सहभागी झाल्या. मेळाव्यात मेहरुन्निसा अश्‍पाक अहमद या महिलेने हिजाब- बुरख्याचे महत्व विषद केले. महिलांनी आयुष्यभर हिजाब- बुरखा वापरावा, असे श्रीमती अहमद यांनी सांगितले.

मदनी रोड येथील जमियतच्या कार्यालयात दोन दिवसापुर्वी झालेल्या बैठकीत महिला मेळावा व हिजाब दिवस पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महिला मेळावा यशस्वीतेसाठी शहरात जोरदार प्रचार करण्यात आला होता. आज दुपारनंतर कामकाज आटोपून प्रत्येक घरातून किमान एक महिला हिजाब-बुरखा परिधान करुन मेळाव्यात गटागटाने सहभागी झाल्या. मेळावा यशस्वीतेसाठी नियाज लोधी, मौलाना तौसिफ, मौलाना इम्तियाज एकबाल, अनिस फलाई, इम्रान नदवी, मुफ्ती इम्तियाज फलाई आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT