hindu jan aakrosh morcha, ahmednagar
hindu jan aakrosh morcha, ahmednagar  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Love Jihad Act: राज्यासह देशभरात 'लव्ह जिहाद' कायदा लागू करा; नगरला 'हिंदू जनआक्रोश'मोर्चा

सरकारनामा ब्यूरो

अहमदनगर : शिंदे फडणवीस सरकारने राज्यात 'लव्ह जिहाद' कायदा लागू करण्याबाबत जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. या कायद्यावरुन सत्ताधारी विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे. पण आता अहमदनगर येथे 'लव्ह जिहाद (Love Jihad) धर्मांतरण'विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा या मागणीसाठी हिंदू जनजागरण आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे.

अहमदनगर येथे 'लव्ह जिहाद धर्मांतरण'विरोधी कायद्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहेत. माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा सुरू झाला आहे.

मोर्चाचा समारोप दुपारी एक वाजता दिल्लीगेट येथील सभेने होणार आहे. या मोर्चाला कालीपुत्र कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) उपस्थित आहेत.

माळीवाडा, पाचपीर चावडी, कापडबाजार असा मोर्चा आला आहे... गर्दी होऊ नये म्हणून मोर्चाचे दोन टप्पे करण्यात आले आहेत. यावेळी मोर्चातील सहभागी नागरिकांकडून जय भवानी , जय शिवाजी सारख्या घोषणा देखील करण्यात आल्या आहेत.

लव्ह जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू करण्याची सरकारची तयारी सुरु आहे अशा चर्चांना उधाण आलं आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात कायदा मंजूर करण्याच्या सरकारच्या हालचाली सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणानंतर राज्यात संतापाची लाट आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार उत्तर प्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT