Adway Hire & Prasad Hire with supporters
Adway Hire & Prasad Hire with supporters Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

निमगाव मल्टी परपज सोसायटी हिरेंचीच बाजी!

Sampat Devgire

निमगाव : जिल्ह्याचे (Nashik) लक्ष लागून असलेल्या येथील ‘निमगाव मल्टी परपज’ (Nimgaon) सोसायटीच्या निवडणुकीत हिरेंनी (Hire Family) बाजी मारली. आपल्या मातृभूमीत अद्वय हिरे (Adway Hir) व प्रसाद हिरे (Prasad hire) विजयी झाले. या विजयातून निमगाववर हिरे घराण्याची पकड असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

सोसायटी निवडणुकीत जोरदार प्रचार रंगला. हिरे कुटुंबियांसाठी ही प्रतिष्ठेची लढत होती. भाजपचे युवानेते अद्वय हिरे यांची इतर मागासवर्गीय प्रवर्गातून यापुर्वीच बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित जागांसाठी सोमवारी मतदान घेण्यात आले.

मतदान केंद्राबाहेर पॅनलचे नेते ठाण मांडून होते. दोन पॅनलमध्ये झालेली ही लढत कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलने जिंकली. पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकून इतिहास घडविला. विरोधी कर्मवीर विकास पॅनलचा धुव्वा उडाला.

विजयी उमेदवारांमध्ये अद्वय हिरे (बिनविरोध), युवानेते प्रसाद हिरे, दत्तू मोरे, अशोक हिरे, दादाजी हिरे, सचिन हिरे, पोपट हिरे, साहेबराव हिरे, प्रसाद जगन्नाथ हिरे, रामराव मोरे, रेखा हिरे, वाल्याबाई हिरे, महेश मोरे यांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वृषाली पाटील यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भिला निकम, सुनील बनकर यांनी सहाय्य केले.

या वेळी सरपंच तुषार जगताप, रावळगावचे माजी सरपंच अशोक आखाडे, लालजी देवरे, दीपक अहिरे, पी. के. सावंत, डॉ. मनोज हिरे, ॲड. मंगेश हिरे, भरत हिरे, मनोज अहिरे, विकास हिरे, भाऊसाहेब हिरे, प्रसाद मोरे, व्यंकटेश बँकेचे उपाध्यक्ष लकी खैरनार, शेतकी संघाचे अध्यक्ष प्रवीण हिरे, डॉ. रवींद्र हिरे, श्रीकांत वाघ उपस्थित होते. तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक एम. व्ही. मोरे, आर. आर. हिरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

निमगाव ही जन्मभूमी आहे. आम्ही दोघं हिरे एकत्र आल्याने येणाऱ्या सर्व निवडणुका या विकासाच्या मुद्यावर लढू. एकत्र निर्णय घेऊन कामकाज करू. मल्टी परपाज सोसायटी ही पूर्ण विकसित करून गावाचा कायापालट करू.

- अद्वय हिरे, युवानेते, भाजप

----

आजची निवडणूक ही अगदी शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. निमगाव वरचे प्रेम कधीच कमी होऊ देणार नाही. सोसायटीच्या माध्यमातून विकासाची गंगा आणता येईल. रणरणत्या उन्हात तुम्ही साथ दिली, तशी आमची साथ कायम राहील.

- प्रसाद हिरे, कॉंग्रेस नेते

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT