Home minister Dilip Walse Patil with NCP lead

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

गृहमंत्र्यांनी `या`साठी केले चोपडाच्या सहकारातील नेत्यांचे कौतुक!

तापी सूतगिरणीच्या जिनिंग व प्रेसिंग या नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

Sampat Devgire

चोपडा : शेतकऱ्यांची संस्था सचोटी व प्रामाणिकपणे चालली आहे. शेतकरी हिताची कामे होत असल्याने सहकारी संस्था प्रगती साधत आहेत. तापी सूतगिरणीचे चेअरमन माजी आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प चांगली प्रगती साधत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल, असा विश्वास राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी येथे केले.

तापी सहकारी सूतगिरणीच्या धरणगाव रस्त्यावरील कार्यस्थळ परिसरात रेल मारुती जिनिंग प्रेसिंगचे भूमिपूजनप्रसंगी वळसे पाटील बोलत होते. माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी अध्यक्षस्थानी होते. मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करुन व कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले. या वेळी अतिथींचा सत्कार सूतगिरणी चेअरमन माजी आमदार कैलास पाटील, व्हाइस चेअरमन प्रभाकर पाटील व संचालकांनी केला.

चेअरमन पाटील म्हणाले, की सूतगिरणी तालुक्यात सुरू झाल्यानंतर तरूणांना रोजगार उपलब्ध करुन देता आला आहे. सुमारे शंभर कोटींचा हा प्रकल्प सभासद शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा देणारा ठरावा म्हणून जिनिंग प्रेसिंग सुरू केली जाणार आहे. अंदाजे चार कोटी रुपयात याची उभारणी होणार असली तरी पंधरा कोटी रुपये त्यासाठी उभारावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होईल.

या वेळी माजी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील (अमळनेर), जिल्हा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, जिल्हा बॅंक संचालक घनःश्याम अग्रवाल, माजी आमदार दिलीप सोनवणे, मनीष जैन, चोसाकाचे माजी चेअरमन ॲड. घनःश्याम पाटील, नीता पाटील, पंचायत समिती सभापती कल्पना पाटील, उपसभापती सूर्यकांत खैरनार, चोसाका चेअरमन अतुल ठाकरे, व्हाइस चेअरमन शशिकांत देवरे आदी उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT