Jalgaon corporation Building
Jalgaon corporation Building Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

यह क्या जनता को पिलाएंगे, खुदही प्यासे है!

Sampat Devgire

जळगाव : ‘यह क्या जनता को पाणी पिलाएंगे, ये तो खुदही प्यासे है’ या हिंदी शेरची आठवण व्हावी, असा प्रकार बुधवारी महापालिकेत (municiple Corporation) दिसून आला. जळगाव (Jalgaon) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या सतरा मजली इमारतीतच पाणीटंचाई (Water scarcity) दिसून आली. कर्मचारी अक्षरश: बाटल्या घेऊन थेट इमारतीखाली धावपळ करताना दिसत होते. (They are allreadt Thirsty how can they give us water)

सतरा मजली इमारतीत पाण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. थंड पाण्याचे कुलर असून, त्याद्वारे काही मजल्यांवर पाण्याची सुविधा केली आहे. विशेषत: पाचव्या, आठव्या, दहाव्या, व तेराव्या आणि सतराव्या मजल्यावर पाण्याचे नळ बसविले आहेत. खालच्या बहुतेक मजल्यावरील कर्मचारी पाचव्या मजल्यावर नळाद्वारे पाणी बाटल्यात भरून नेत असतात. प्रत्येक विभागात या नळाद्वारे पाणी बाटल्यात भरून ठेवण्यात येते.

चक्क पिवळसर पाणी

सतरा मजली इमारतीत बुधवारी सकाळी पाणी आले. मात्र, ते पिवळसर असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी पाणी भरलेच नाही. मात्र, दुपारी बारानंतर नळाचे पाणी बंद झाले. प्रत्येक विभागातील कर्मचारी बाटल्या घेऊन लिप्टमधून या मजल्यावरून त्या मजल्यावर धावाधाव करीत होते. मात्र, ज्या मजल्यावर पाण्याची सुविधा होती, त्या मजल्यावरील नळांना पाणीच नव्हते. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी सतरा मजली इमारतीच्या खाली जाऊन पाणी आणले. सायंकाळपर्यंत या नळांना पाणी आलेच नव्हते. सतरा मजली इमारतीतील पाणी का बंद होते. याबाबत मात्र कुणीही माहिती देऊ शकले नाही.

अधिकारी व पदाधिकारीही उपस्थित होते, तर काही नगरसेवकही होते. मात्र, सर्वजण आपल्या आपल्या कामात व्यस्त होते. कर्मचाऱ्याच्या या धावपळीची कोणी दखलही घेतली नाही. आपल्याच कार्यालयातील पाणीटंचाईची दखल न घेणारे अधिकारी व पदाधिकारी जनतेची किती दखल घेणार हाच प्रश्‍न आहे. ‘दिव्या खाली अंधार’, असाच प्रकार बुधवारी सतरा मजली इमारतीत दिसून आला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT