Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gulabrao Patil News: 'आमदारकी-खासदारकीच्या निवडणुकीत युती, मग 'स्थानिक'ला का नाही? 2-4 जागा...'; गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

Shivsena Political News : भाजपावाले एकीकडे आपल्याला युती करायची सांगतात आणि एकांतात स्वबळाची भाषा बोलतात. त्यामुळे भाजपावाल्यांना आपलं सांगणं आहे, जिल्हा परिषद निवडणुकीत ते वेगवेगळेचे वारे वाहत आहे. पण त्यामुळे कार्यकर्ते मरून जातील.

Deepak Kulkarni

Jalgaon News : विधानसभा निवडणुकीतील यश-अपयशानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.त्यातही महायुती असो वा महाविकास आघाडी असेल यांचं युती-आघाडीबाबत अजून काहीच निश्चित असं धोरण ठरलेलं नाही. स्वबळासाठीही चाचपणी सुरू आहे. पण आता याचदरम्यान,एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यानं भाजपला युतीसाठी भावनिक साद घातली आहे.

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी जळगाव येथील एका कार्यक्रमात शनिवारी (ता.4 ऑक्टोबर) हे महायुतीबाबत मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, भाजपावाले एकीकडे आपल्याला युती करायची सांगतात आणि एकांतात स्वबळाची भाषा बोलतात. त्यामुळे भाजपावाल्यांना आपलं सांगणं आहे, जिल्हा परिषद निवडणुकीत ते वेगवेगळेचे वारे वाहत आहे. पण त्यामुळे कार्यकर्ते मरून जातील.

पाटील म्हणाले, तुम्ही शंभर जागा लढले तर आम्ही पन्नास तरी लढू.दोन चार जागा इकडे तिकडे करा, पण कार्यकर्त्याला मोठे करण्याची हीच निवडणूक संधी असते. त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी सगळ्यांनी विचार केला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक (Local Body Elections) ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते,त्यामुळे हवं तर तुम्ही 100 जागा लढा,आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे 50 जागा लढतो,पण युती करावी असं भाजपला भावनिक आवाहन केलं आहे.

'आमदारकी-खासदारकीच्या निवडणुकीत युती केली जाते, मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती का करत नाही? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.तसेच दोन-चार जागा इकडे तिकडे करा,पण युती करा.जर युती केली नाही,तर कार्यकर्ते मरुन जातील असंही मंत्री गुलाबराव पाटील यांनी या कार्यक्रमात बोलून दाखवलं.

आमच्यावर गद्दार म्हणून नेहमीच टीका झाली आहे,अजूनही होत आहे.पण आमचं कामच आहे टीका ऐकण्याचं असंही पाटील म्हणाले. राजकारणात विरोधक असायला हवे,तरंच राजकारण चालेल.विरोधक हे होकायंत्राप्रमाणे असतात.त्यांनी केलेली टीका ही आपल्यासाठी मार्गदर्शक असल्यानं फायद्याची ठरते.

आमच्यावर विरोधक किती टीका करतात.लोक हुशार झाले आहेत,पहिल्या वेळेस निवडून येता येते. मात्र सलग तीन-चारवेळा निवडून आला, तोच खरा नेता असल्याची प्रतिक्रियाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT