MNS leader of Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मनसे म्हणते, राज ठाकरेंचे `ते` प्रकल्प ऊर्जितावस्थेत आणणार!

महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सत्ताकाळ नाशिककरांनी अनुभवला आहे.

Sampat Devgire

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तयारीला सगळेच पक्ष लागले आहेत. (All Parties preparing for upcoming NMC election) मात्र अद्यापही मनसेला सुर गवसेना अशी स्थिती आहे. (MNS) हा पक्ष पुन्हा एकदा भूतकाळात रमण्याची चिन्हे आहे. आगामी निवडणूकीत सत्तेत येऊ आणि राज ठाकरे (Raj Thakre) यांनी नाशिकला दिलेले प्रकल्प उर्जितावस्थेत आणू असा दावा त्यांनी केला आहे.

महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सत्ताकाळ नाशिककरांनी अनुभवला आहे. सामाजिक दायित्वाच्या निधीतून मनसेने उभारलेल्या प्रकल्पांची सत्तांतरानंतर वाताहात झाली आहे. त्यामुळे सत्ता आल्यास मनसेच्या प्रकल्पांना ऊर्जितावस्था आणण्याबरोबरच पार्किंगचा प्रश्‍न सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. पांजरपोळच्या जागेवर आयटी पार्क, तर सुरक्षेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी मनसेचे पदाधिकारी त्यांच्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहेत, असे आश्‍वासन मनसेच्या शिष्टमंडळाने बुधवारी दिले.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी ऑगस्ट महिन्यात सहा विभागांमध्ये विशेष मोहीम राबविली. मोहिमेंतर्गत महिला व युवकांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा नाशिककरांच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आल्या. नाशिककरांच्या जाहीरनाम्याचा अहवाल मनसेच्या शिष्टमंडळाकडे सुपूर्द करण्यात आला. नाशिककरांच्या जाहीरनाम्याचे स्वागत करताना शहर विकासासाठी व्यक्त केलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे आश्‍वासन शिष्टमंडळाने दिले. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी भूमिका स्पष्ट केली. मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर, जिल्हाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, अंकुश पवार, समन्वयक सचिन भोसले, सातपूर प्रभाग समिती सभापती योगेश शेवरे, विभाग अध्यक्ष योगेश लभडे, सत्यम खंडाळे, शहर उपाध्यक्ष सचिन सिन्हा, जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य बोडके, शाखाध्यक्ष सचिन सांगळे, जितेंद्र कुलथे, राहुल सहाणे, विनोद यादव उपस्थित होते.

यावेळी पादधिकारी म्हणाले, मनसेची सत्ता आल्यास स्पोर्ट्‌स हबला प्रधान्य देण्यात येईल. पर्यटनाला चालना मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करू. पांजरपोळच्या जागेवर आयटी हब करण्यासाठी मनसेचे प्रयत्न राहतील. किमान वेतन कायद्यानुसार औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांना वेतन मिळण्यासाठी प्रयत्न करू. तसेच मराठी तरुणांना रोजगार मिळविण्यासाठी मनसेचे सातत्याने प्रयत्न आहेत. आता कंपनी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळविण्यासाठी मोहीम राबवू आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सिंहस्थ कुंभमेळ्याचे मार्केटिंग करू.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT