MLA Suhas Kande
MLA Suhas Kande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मरेपर्यंत डोक्यात आमदार असल्याची हवा जाऊ देणार नाही!

Sampat Devgire

साकोरा : शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपले उपकार विसरणार नाही. मरेपर्यंत कधी डोक्यात आमदार (MLA)असल्याची हवा जाऊ देणार नाही, मी आपला सेवक आहे आणि आपली सेवा करणे हेच माझे कर्तव्य आहे, अशी ग्वाही आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी दिली.

साकोरा जिल्हा परिषद गटाचा शिवसेना कार्यकर्ता मेळावा वैष्णवी मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्याला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. भविष्यातील निवडणुका आणि कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठी या विषयावर चर्चा करण्यात आली. साकोरा येथे शिवजयंतीनिमित्त झालेल्या तांगा शर्यतीमध्ये प्रथम पारितोषिक पटकावलेल्या विजेत्यांना आमदार कांदे यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. लवकरच आपण तालुक्यात भव्य- दिव्य तांगा शर्यत आयोजन करणार असल्याचे ते म्हणाले.

नांदगाव येथे जुन्या पंचायत समिती जागेवर शिवसृष्टीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा व भव्य- दिव्य शिवसृष्टी उभारणार असून, कालबाह्य झालेली ५६ खेडी योजना रद्द करून ७८ खेडी योजना मंजूर झाली असून, लवकरच तिचे काम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, पंचायत समिती सभापती सुभाष कुटे, सदस्य सुमनताई निकम, राजाभाऊ जगताप, विष्णू निकम, शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे, गुलाब भाबड, अमोल नावंदर, शहरप्रमुख सुनील जाधव, युवा सेना तालुकाप्रमुख सागर हिरे, साकोरा गट प्रतिनिधी सूरज बोरसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT