Vinod Tawde latest News
Vinod Tawde latest News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vinod Tawade : मी दिल्लीत आनंदी; राज्याच्या राजकारणात नसल्याची अजिबात खंत नाही!

Sampat Devgire

मुंबई : राज्याच्या (State Politics) राजकारणात नाही, याची अजिबात खंत नाही. मी राष्ट्रीय राजकारणात (National politics) आहे, त्यात आनंदी आहे. वेगवेगळ्या राज्यांचे राजकारण शिकायला मिळते, त्यात आनंद आहे, अशी प्रतिक्रीया भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते, माजी मंत्री तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी सांगितले. ते राज्य मंत्रीमंडळाच्या शपथविधीला उपस्थित होते. ( I am happy in national politics in Delhi)

ज्या पद्धतीने हे सरकार आले, ते पाहता थोडासा विलंब अपेक्षीत होताच. निवडणूक झाल्यावर जेव्हा सरकार स्थापन होते, त्यात बहुतांशी विषयांची चर्चा आधीच झालेली असते. त्यामुळे त्यात फारसा विलंब होत नसतो. इथे शिवसेनेतून एक मोठा गट नाराज झाला. त्यानंतर नाराजीतून तसेच हिंदुत्वाच्या मुद्यावर हा गट इकडे आला. त्याचा विचार करता, थोडं दोन्ही पक्षांचे मनोमिलन होण्यासाठी थोडा वेळ लागतो. विविध विषयावर जे विचारमंथन होते, ते झाले आहे. आता मंत्रीमंडळाचा विस्तार झाला आहे. त्यात सगळ्या समाजांना, सर्व भागांना स्थान त्यात देण्यात आले. सर्वसमावेषक मंत्रीमंडळ झाले आहे.

ते पुढे म्हणाले, याआधीच्या सरकारने ज्या निष्क्रीयतेने काम केले, ते पाहता या सरकारकडून लोकांच्या खुप अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा नक्की पूर्ण करेल.

बिहारमध्ये भारतीय जनता पक्षापासून संयुक्त जनता दल वेगळा झाला. भाजपपासून पक्ष दूर का जात आहेत, यावर श्री. तावडे म्हणाले, गेल्या निवडणुकीत बिहारमध्ये भाजपचे आमदार जास्त असताना नितीशकुमार यांना भाजपने मुख्यमंत्री केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी तो निर्णय घेतला होता. ते दोघेही या स्थितीतून मार्ग काढतील.

महाराष्ट्रात देखील भविष्यात असे चित्र पहायला मिळेल का?, यावर ते म्हणाले, भविष्यात काय होईल यावर चित्र मांडता येत नाही. सद्यस्थितीत काय आहे, त्यानुसार काम करायचे असते. मी राज्याच्या राजकारणात नाही. याची खंत वाटत नाही. राष्ट्रीय राजकारणात आहे, तीथे काम करताना एक वेगळा आनंद आहे. अनेक राज्यांतील राजकारण शिकायला मिळते. त्यामुळे मी दिल्लीत आनंदी आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT