Girish Mahajan & Eknath Khadse 
उत्तर महाराष्ट्र

मी त्यांना पाडले, हे कळायला एकनाथ खडसेंना दोन वर्षे लागली?

खरे तर एकनाथ खडसेंचा मतदारसंघ त्यांच्यासाठी कधीच सुरक्षीत नव्हता.

Sampat Devgire

नाशिक : खरे तर एकनाथ खडसेंचा मतदारसंघ (Eknath Khadse`s constituency never secure & safe for him) त्यांच्यासाठी कधीच सुरक्षीत नव्हता. असे का होते, हे त्यांनाच माहित. (Why this he can only explain) मात्र त्यांना निवडणूकीत मी पाडले असा ते आरोप करतात. मी त्यांना पाडले हे कळायला सुद्धा त्यांना दोन वर्षे लागली? ( I am responsibel for his defeat this he realise after 2 yesrs) असा प्रश्न भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला.

माझ्या पराभवाला जामनेरवाला कारणीभूत आहे. या खडसे यांच्या आरोपाविषयी श्री. महाजन पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, एकनाथ खडसे यापूर्वी साडे सात हजार मतांनी निवडून आले होते. त्यानंतर एकदा १२०० मतांनी निवडून आले होते. यावेळेला ते पडले. त्यांचा मतदारसंघ एव्हढा सुरक्षीत देखील नव्हता. त्याचे कारण त्यांनाच माहिती असेल. मात्र खुप जनमत त्यांच्या पाठीशी होते. खुप मतांनी ते निवडून येत आहे. त्यांच्यामागे खुप जनत होते असं कधीही नव्हते. पूर्वीपासून ते काठावर निवडून येत होते.

ते रोजच माझ्यावर आरोप करीत असतात. आज कोणता आरोप केला मला माहिती नाही. मात्र त्यांच्या मुलीच्या पराभवामागे `जामनेरवाला` आहे. या त्यांच्या म्हनण्यात तत्थ्य नाही. यावेळेला ते निवडणूकीत पडले त्याला कोणालाही दोष देऊन उपयोग नाही. कधीम्हणता फडणवीस यांनी पाडले. कधी म्हणतात मी पाडले. मी तर चार महिने माझ्या मतदारसंघात देखील पाय ठेवला नव्हता. मी बाहेरच फिरत होते. निवडणूकीत अर्ज भरण्याच्या दिवशीच गेलो. सांगून गेलो की मी तीन महिने प्रचाराला देखील येणार नाही. परंतु आता आपण पडलो त्याचा दोष कोणाला तरी देण्यासाठी कींवा आपण पराभूत झालो याचे कारण त्यांना दोन वर्षांनी कळाले,की त्यांना मी पाडले. हे दुर्दैव आहे.

जळगाव जिल्हा बँक बिनविरोध?

आपण बघतो, राज्यातील अनेक सहकारी बँका आहेत, त्यांची आर्थिक स्थिती अतिशय खराब आहे. त्या डबघाईला आलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे, की जळगाव जिल्ह्याची बॅंक ही शेतकऱ्यांची बँक आहे. सहकारी संस्था आहे. त्यामुळे त्यात कुठेही राजकारण न करता ती उर्जीतावस्थेत आणावे. त्या व्यवस्थीत व चांगल्या चालल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा. निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यात नव्वद टक्के काम झाले आहे. येत्या एक दोन दिवसांत जळगाव जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध करू.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT