Dr. Vijaykumar Gavit
Dr. Vijaykumar Gavit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vijaykumar Gavit: आदिवासी खात्याला न्याय देईन!

Sampat Devgire

नवापूर : आदिवासी विकास विभाग (Trible Devolopment Department) हे खाते पुनःश्च मला मिळाले आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच नवापूर (Navapur) तालुका हा विकासाच्या (Devolopment) दृष्टिकोनातून सदैव मी अग्रस्थानी ठेवला आहे. आदिवासी विकास विभाग खात्याला पूर्णपणे न्याय द्यायचा प्रयत्न करेल असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. (I have allways given justice to Navapur Taluka)

भाजपतर्फे नवापूर येथे मंत्री गावित यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी व्हावे. प्रत्येकाने आपल्या घरावर, दुकानावर तिरंगा लावून राष्ट्रप्रेमाचा संदेश जगभर द्या असे आवाहन डॉ. गावित यांने यावेळी केले.

भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावित व पदाधिकारी यांनी शहराच्या प्रवेशद्वाराजवळ स्वागत केले. तिरंगा यात्रेला सुरवात करून सजवलेल्या गाडीतून डॉ. गावित यांची मिरवणूक काढण्यात आली. शहरातील साईमंदिर, बसस्थानक, लाइट बाजारमार्गे सरदार चौकात मिरवणुकीचा समारोप झाला. मिरवणुकीचे रुपांतर सभेत झाले.

भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावित म्हणाले, भाजप शिवसेनेचे सरकार आल्यावर डॉ. विजयकुमार गावित यांना पुन्हा आदिवासी विकास मंत्रिपद मिळाले, आता तालुक्याचा व जिल्ह्याचा विकास रथ वेगाने धावेल. आघाडी सरकारच्या काळात खूपच अपमानास्पद वागणूक मिळाली, नागरिकांच्या कामासाठी वारंवार आंदोलन करावे लागले, मात्र आता पुन्हा डॉ. विजयकुमार गावित यांना मंत्री पद मिळाल्याने सर्व उणिवा भरून निघतील. तालुक्यातील सर्व सरपंचांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रतिमा मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आली.

सुमाणिक प्राथमिक विद्यालय, हेमलता डी. वळवी अनुदानित आश्रमशाळा, पांघराण अनुदानित आश्रमशाळा, कारेघाट या शाळांचे विद्यार्थी तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले, नीलेश प्रजापत यांनी आभार मानले.

यावेळी जि.प सदस्य संगीता गावित, पुष्पा गावित जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, माजी आमदार शरद गावित, नगरसेवक गिरीश गावित, जयवंत जाधव, अजय गावित, धनंजय गावित, कुणाल दुसाने, हेमंत शर्मा, शरद लोहार, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT