Avishkar Bhuse, Yuva sena
Avishkar Bhuse, Yuva sena Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

काम करायचे नसेल तर युवा सेनेची पदे तातडीने सोडावी!

Sampat Devgire

नंदुरबार : जिल्ह्यात (Nandurbar) होणाऱ्या आगामी निवडणुकीसंदर्भात तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (North Maharashtra University) निवडणुकीच्या निवडणुका जिंकण्यासाठी आपल्या सर्वांना तयारीला लागावे लागेल,त्यासाठी नियोजन करावे, असे आवाहन शिवसेना युवा सेनेचे (Yuva sena) विभागीय सचिव अविष्कार भुसे (Avishkar Bhuse) यांनी केले.

आगामी निवडणुकीच्या संदर्भात शिवसेनेच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत श्री. भुसे बोलत होते. ते म्हणाले की, आगामी काळात विविध निवडणुका लागणार आहेत. त्या निवडणुकांमध्ये ताकद दाखविण्याची ही वेळ आहे. त्यामुळे युवा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपसांतील मतभेद विसरून जोमाने कामाला लागावे, ज्यांना काम करायचे नसेल व केवळ पद अडकवून बसले असतील अशा पदाधिकाऱ्यांनी पदे रिक्त केली तरी चालेल, मात्र काम न करता पद अडकवून बसणारे चालणार नाहीत. असा इशाराही यावेळी श्री. भुसे यांनी दिला.

श्री. भुसे म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी सामान्यांच्या प्रश्नावर सातत्याने अतिशय संवेदनशीलपणे प्रतिसाद दिलेला आहे. लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतानाच अतिशय सक्रीयतेने त्याची सोडवणूक केली आहे. युवकांच्या व शैक्षणीक प्रश्नांसाठी युवा सेना सातत्याने पुढे असते. त्यात आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व आहे. त्यामुळे युवकांनी युवा सेनेच्या झेंड्याखाली एकत्र यावे. विद्यापीठ, महाविद्यालये व शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांची सोडवणूक आपण सर्व निश्चितपणे करू.

यावेळी धुळे -नंदुरबार जिल्हा विस्तारक पंकज गोरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राम रघुवंशी, जि प चे कृषी सभापती गणेश पराडके, सहसंपर्क प्रमुख दीपक गवते,युवासेना जिल्हाप्रमुख अर्जुन मराठे, युवती सेना जिल्हाध्यक्ष मालती वळवी, उपजिल्हाप्रमुख रवींद्र गिरासे, युवासेना जिल्हा सचिव दिनेश भोपे, शहर अधिकारी दादा कोळी ,शिवसेना शाखा प्रमुख दिग्विजय पाटील, लखन माळी, आनंद पाटील आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT